Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालच्या गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयावर आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य, 'त्याने पैशांसाठी...'

Yashasvi Jaiswal Aakash Chopra : यशस्वी जयस्वालने मुंबईच्या रणजी संघाऐवजी गोव्याकडून खेळण्याचे ठरवले आहे. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. या प्रकरणावर आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal x
Published On

यशस्वी जयस्वालने रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा मुंबईच्या ऐवजी गोव्याच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एनओसीसह गोव्याकडून खेळण्याची परवानगी मागितली होती. त्याच दरम्यान मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी यशस्वी जयस्वालचा वाद झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागल्या.

मुंबईऐवजी गोव्याकडून खेळण्याच्या यशस्वी जयस्वालच्या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने देखील भाष्य केले आहे. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 'यशस्वी जयस्वालचे मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्यासाठी जाणे ही मोठी बाब आहे', असे म्हणाला.

Yashasvi Jaiswal
Dhoni-Jadeja : जडेजाचा थ्रो आणि धोनीची स्टंपिग, चेपॉकच्या मैदानात दिसली जबरदस्त केमिस्ट्री, Video व्हायरल

'यशस्वीने पैशांसाठी गोव्याच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतलेला नाही. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना पगार मिळतो. मी स्वत: ३ वर्षे प्रोफेशनल क्रिकेट खेळलो आहे. पूर्वी पैशांसाठी असे निर्णय घेतले जात. पण यशस्वी जयस्वालचे आयपीएलमधील मानधान १८ कोटी रुपये आहे. भारतीय संघाच्या वार्षिक कराराच्या यादीत त्याचे नाव आहे. तो पैशांसाठी असं करणार नाही', असे आकाश चोप्रा म्हणाला.

Yashasvi Jaiswal
Digvesh Rathi : मानधन ३० लाख अन् दंड बसला ५ लाख! दिग्वेश राठीला नोटबुक सेलिब्रेशन भोवलं

सध्या यशस्वी जयस्वाल आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यशस्वी जयस्वाल धावा करण्यात अयशस्वी ठरला होता. आज पंजाब विरुद्ध राजस्थान या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल चांगला खेळ करेल अशी चाहत्यांनी आशा व्यक्त केली आहे.

Yashasvi Jaiswal
MS Dhoni : चेन्नईत मॅच, स्टेडियममध्ये आई-वडील, अन् जडेजाची ती स्टोरी... धोनी रिटायरमेंट घोषित करणार? जोरदार चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com