Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

Anaya Bangar Instagram : भारतीय माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलाने, आर्यनने लिंग परिवर्तन केले आहे. त्याने अनाया अशी नवी ओळख स्वीकारली आहे. अनायाच्या व्हिडीओवरील कमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Anaya Bangar Instagram
Anaya Bangar Instagram Instagram
Published On

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. संजय बांगर सध्या आयपीएलमध्ये समालोचक म्हणून काम करत आहेत. त्यांचे विराट कोहलीशी घनिष्ठ संबंध आहेत. आरसीबीसह टीम इंडियाला त्यांनी कोचिंग दिली आहे. संजय बांगर यांच्या मुलाने, आर्यन बांगरने लिंग परिवर्तन केले आहे. ऑपरेशननंतर आर्यनने अनाया या नव्या नावाचा स्वीकार केला आहे.

काही दिवस इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर अनाया बांगरने भारतात येण्याचा निर्णय घेतली. ती नुकतीच मायदेशी परतली आहे. अनाया बांगर सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका फॅनने कमेंट केली. या फॅनने अनाया बांगरला कमेंटच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली. या गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

Anaya Bangar Instagram
IPL 2025 : 'सरड्या' वरून राडा! नवज्योतसिंग सिद्धू अन् अंबाती रायुडू Live Tv वर भिडले; कॉमेंट्री बॉक्समधील Video Viral

अनाया बांगरने ७ एप्रिल रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला. यात अनायाने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी भारतीय पारंपारिक कपड्यांच्या प्रेमात आहे' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओच्या खाली एकाने 'माझ्या मम्मीची सून बनशील का... अनाया' असे कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

anaya bangar
anaya bangarinstagram
Anaya Bangar Instagram
Viral : ओ चाचा.. मूत्रालय नाही, मंत्रालय लिहिलंय; मंत्रालयाच्या भिंतीवर लघुशंका करणाऱ्या काकांचा व्हिडीओ व्हायरल

इंग्लंडहून परतल्यानंतर अनाया सध्या दिल्लीमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अनाया चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असते. अनायाने आयपीएल सामने पाहण्यासाठी मुंबईत यावे अशी मागणी तिचे चाहते करत आहेत. मुंबईचा सामना पाहण्यासाठी मी नक्कीच मुंबईला येईल असे तिने म्हटले आहे. लिंग परिवर्तनाआधी अनाया मुंबईकडून क्रिकेट खेळायची. ती ऑल राउंडर होती.

Anaya Bangar Instagram
Mary Kom : मेरी कोम पुन्हा प्रेमात? बॉक्सरला करतेय डेट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com