स्ट्रेचरवरून मैदान सोडले, संघ अडचणीत आल्यावर वेदनेसह पुन्हा फलंदाजीला आली; Mumbai Indians च्या स्टार खेळाडूने हवा केली

Hayley Matthews : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड या सामन्यामध्ये कर्णधार हेली मॅथ्यूजने दुखापतग्रस्त असतानाही शतकीय खेळी केली. स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेलेली हेली संघ अडचणीत असतानाही मैदानात उतरली. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
Hayley Matthews
Hayley Matthewsx
Published On

महिला विश्वचषक २०२५ साठीचे क्वालिफिकेशन सामने खेळले जात आहेत. स्पर्धेत काल (९ मार्च) खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज दुखापतग्रस्त झाली. दुखापतीमुळे तिला फलंदाजी करता येत नव्हती. स्ट्रेचरवर नेऊन तिला मैदानाच्या बाहेर नेण्यात आले आणि रिटायर्ट हर्ट म्हणून घोषित करण्यात आले. पुढे संघाला गरज असताना हेली मॅथ्यूज पुन्हा मैदानात उतरली. चौकार-षटकारांचा वर्षाव करत तिने शतक पूर्ण केले. पण हा सामना वेस्ट इंडिजच्या संघाने गमावला आहे. हेली मॅथ्यूज डब्लूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळते.

महिला विश्वचषक २०२५ च्या क्वालिफायर सामन्यात वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड हे दोन संघ आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करत स्कॉटलँडच्या महिला संघाने ४५ ओव्हर्समध्ये २४४ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा महिला संघ मैदानात उतरला. पहिली विकेट पडल्यानंतर हेलीने जायदा जेम्ससह खेळ सावरत मिळून ११३ धावांची भागीदारी केली. ३९ व्या ओव्हरमध्ये त्रास सहन न झाल्याने तिने रिटायर्ट हर्ट होण्याचा निर्णय घेतला.

Hayley Matthews
Ambati Rayudu : धोनीवरुन कॉमेंट्री बॉक्समधील वातावरण तापलं, सिद्धू-सेहवागला अंबाती रायडू भिडला

फलंदाजी करताना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये हेली मॅथ्यूजला दुखापत झाली होती. पण वेदना सहन करत तिने खेळणे सुरु ठेवले. संघाचे फिजिओ मैदानात येऊन हेलीचा इलाज करत होते. ३९ व्या ओव्हरमध्ये वेदना सहन होत नसल्याने हेलीने मैदानाबाहेर जाण्याचे ठरवले. तिला स्ट्रेचरवरुन डगआउटमध्ये नेण्यात आले होते.

Hayley Matthews
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

४२ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर वेस्ट इंडिज संघाची आठवी विकेट पडली. संघाला गरज असल्याचे लक्षात घेऊन हेलीने पुन्हा मैदानात परतण्याचा निर्णय घेतला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर चौकार मारुन ती पुन्हा रिटायर्ड हर्ट झाली. तिच्या जागी आलेली कॅथरीन फ्रेज चौथ्या बॉलवर बाद झाली. हेली पुन्हा एकदा मैदानात उतरली. पाचव्या बॉलवर शॉट मारुन धाव घेत हेलीने तिचे शतक पूर्ण केले.

Hayley Matthews
RJ Mahvash : सेक्स लाइफबद्दल युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं मोठं विधान, वाचून अनेकांच्या उंचावल्या भुवया

४२ व्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजची धावसंख्या २०५ होती. आठ ओव्हर्समध्ये त्यांना ४० धावा करणे आवश्यक होते आणि वेस्ट इंडिज महिला संघाची एक विकेट बाकी होती. हेलीने लंगडत एका पायावर जोर देत पुढच्या ओव्हरसमध्ये ३ चौकार मारले. तिला आलिया ॲलेनेची साथ मिळाली. १० व्या विकेटसाठी त्यांनी ३० धावांची भागीदारी केली. ४७ व्या ओव्हरमध्ये आलिया बाद झाली आणि वेस्ट इंडिजने सामना गमावला. पण सामन्यापेक्षाही हेली मॅथ्यूजच्या संघर्षपूर्ण खेळीची चर्चा सर्वत्र झाली. तिने ११३ बॉल्समध्ये नाबाद ११४ धावा केल्या.

Hayley Matthews
RJ Mahvash Yuzi Chahal : मी तुझ्यासाठी आलेय, चहलसाठी आरजे महावशची पोस्ट, युजीचंही प्रेम उफाळून आलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com