Olympic 2028 मध्ये क्रिकेटची एन्ट्री, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मिळणार नाही खेळायची संधी

Cricket Olympic : मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या बैठकीत क्रिकेटला ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट केले जावे हा निर्णय घेण्यात आला. २०२८ च्या लॉस एन्जेलिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेटला स्थान मिळाले आहे.
Virat Kohli Rohit Sharma
Virat Kohli Rohit Sharmax
Published On

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. चर्चा, बैठकांनंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२८ च्या लॉस एन्जेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट खेळाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्थान दिले जाणार आहे.

मुंबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या १४१ व्या सत्रामध्ये क्रिकेटचा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात यावा ही मागणी मान्य करण्यात आली. १९०० च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळले जात होते. इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल म्हणजेच आयसीसीमध्ये एकूण १२ फुल मेंबर देश आहेत. तर ९४ असोसिएट देश आहेत. पण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमेंटीने (IOC) लॉस एन्जेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये पुरुष आणि महिला वर्गाच्या एकूण ६-६ संघांना समाविष्ट करण्याची मंजूरी दिली आहे.

Virat Kohli Rohit Sharma
RJ Mahvash : सेक्स लाइफबद्दल युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं मोठं विधान, वाचून अनेकांच्या उंचावल्या भुवया

२०२८ ऑलिंपिक स्पर्धेसाठी टी-२० फॉरमॅट निश्चित करण्यात आला आहे. यात फक्त ६ संघ असतील. पुरुष आणि महिला या दोन्ही श्रेणीतील ९०-९० खेळाडूंचा कोटा देखील मंजूर करण्यात आला आहे. याचा अर्थ क्वालिफाय झालेल्या प्रत्येक देशाकडून या ऑलिंपिक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली जाईल. स्पर्धेसाठी योग्य व्यवस्था करण्याचे IOC ने ICC ला सांगितले आहे. त्यामुळे टॉप क्वालिटीसाठी फक्त ६ संघ खेळवले जाण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जात आहे.

Virat Kohli Rohit Sharma
Mumbai Indians रोहितची टीम नाहीये, ती हार्दिकची... अंबाती रायडू आणि संजय बांगर यांच्यात बाचाबाची, Video व्हायरल

लॉस एन्जेलिस ऑलिंपिकसाठी फक्त ६ संघ निवडले जातील. यासाठीचे पात्रता निकष यांच्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑलिंपिक अमेरिकेत होणार असल्याने अमेरिकेच्या क्रिकेट संघाला फ्री एन्ट्री मिळले. उरलेल्या ५ संघाची निवड आयसीसीच्या रॅकिंगनुसार केली जाईल. थोडक्यात आयसीसीच्या टॉप ५ संघांना ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळायची संधी मिळेल.

Virat Kohli Rohit Sharma
स्ट्रेचरवरून मैदान सोडले, संघ अडचणीत आल्यावर वेदनेसह पुन्हा फलंदाजीला आली; Mumbai Indians च्या स्टार खेळाडूने हवा केली

ऑलिंपिकमध्ये भारताच्या क्रिकेट संघाला खेळण्याची संधी मिळेल असा चाहत्यांना विश्वास आहे. पण या स्पर्धेत भारतीय संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा सहभाग नसेल. ऑलिंपिक स्पर्धेत टी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेटचे सामने खेळले जातील. मागच्या वर्षी विराट आणि रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतला आहे. त्यामुळे ते ऑलिंपिकमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार नाहीत.

Virat Kohli Rohit Sharma
Ambati Rayudu : धोनीवरुन कॉमेंट्री बॉक्समधील वातावरण तापलं, सिद्धू-सेहवागला अंबाती रायडू भिडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com