इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरफराज खानला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. सरफराज खानला संघात स्थान मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छोट्या भावाने म्हणजे मुशीर खानने अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे.
त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तुफानी शतक झळकावलं आहे. हे त्याचं या स्पर्धेतील लागोपाठ दुसरं शतक ठरलं आहे. दरम्यान या शतकी खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
मुशीरची इतिहासाला गवसणी.. या स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १०९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तर यापूर्वी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात.
त्याने १०६ चेंडूंचा सामना करत ११८ धावांची खेळी केली होती. तो सध्या तुफान फॉर्ममध्ये असून आतापर्यंत त्याने या स्पर्धेत ८१.२५ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. या दोन शतकांसह तो एकाच आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत २ शतकं झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी शिखर धवनने असा कारनामा करुन दाखवला होता. त्याने २००४ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत ३ शतकं झळकावली होती.
केवळ फलंदाजीच नव्हे तर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने गोलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे. मुशीर हा सरफराज खानचा धाकटा भाऊ आहे. सरफराज खानने २०१४ आणि २०१६ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय संघाकडून फलंदाजी करताना मुशीर खानने सर्वाधिक १३१ धावांची खेळी केली. तर आदर्श सिंगने ५२ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५० षटकअखेर ८ गडी बाद २९५ धावा केल्या आहेत .तर न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी २९६ धावांची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.