ICC U-19 World Cup 2024: आजपासून रंगणार अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार! पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

U-19 World Cup Schedule: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या या स्पर्धेतील उद्धाटनाच्या सामन्यात आयर्लंड आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
 icc under 19 world cup 2024
icc under 19 world cup 2024saam tv news
Published On

ICC Under 19 World Cup 2024 Team India Schedule : 

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या या स्पर्धेतील उद्धाटनाच्या सामन्यात आयर्लंड आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. तर दुसरा सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २० जानेवारी रोजी भारतीय संघाविरुद्ध होणार आहे.

आजपासून अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ..

अंडर १९ क्रिकेट स्पर्धा ही अतिशय महत्वाची समजली जाते. कारण याच स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडू मिळत असतात. अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतून भारतीय क्रिकेटला विराट कोहली,युवराज सिंग, मोहम्मद कैफ, शिखर धवन, रिषभ पंत,इशान किशन आणित शुभमन गिलसारखे स्टार खेळाडू मिळाले आहेत.

 icc under 19 world cup 2024
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

भारतीय संघाचा पहिला सामना कोणत्या संघासोबत?

या स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. पाच वेळचा अंडर १९ चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना शनिवारी (२० जानेवारी)बांग्लादेश संघाविरद्ध होणार आहे. १९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना ११ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.

इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक..

या स्पर्धेत १६ संघ खेळताना दिसून येणार आहे. या १६ संघांना ४ गटात विभागलं गेलं आहे. प्रत्येक गटातून ३ संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर १२ संघांना २ गटात विभागलं जाईल. या १२ संघांमधून टॉपला असलेले २-२ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. हे सेमीफायनलचे सामने ६ आणि ८ फेब्रुवारी रोजी बेनोनीमध्ये खेळले जाणार आहेत. (Latest sports updates)

 icc under 19 world cup 2024
Team India: टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट- रोहितला संघात स्थान मिळणं कठीण? राहुल द्रविडच्या वक्तव्याने खळबळ

अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा दबदबा..

अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५ वेळेस या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने ३ वेळेस आणि पाकिस्तानने २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर बांगलादेश, वेस्टइंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी प्रत्येकी १-१ सामने जिंकले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com