Team India: टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट- रोहितला संघात स्थान मिळणं कठीण? राहुल द्रविडच्या वक्तव्याने खळबळ

Rahul Dravid On Team India: अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
virat kohli rohit sharma
virat kohli rohit sharmasaam tv news
Published On

Rahul Dravid Statement On Team India:

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. येत्या जून महिन्यात वेस्टइंडिज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने आगामी आयपीएल स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे.

कारण टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला एकही टी-२० मालिका खेळण्याची मिळणार नाहीये. भारतीय संघाने या स्पर्धेपूर्वी शेवटची मालिका अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळली आहे. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर मुख्य कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाने टी-२० मालिकेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा सामना केला आहे. या मालिकांमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली. तर काही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं. या संधीचा फायदा घेत सर्व खेळाडूंनी दमदार खेळ केला. दरम्यान टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याची दावेदारी ठोकली आहे. (Latest sports updates)

virat kohli rohit sharma
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

भारतीय संघात फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कुठल्याही खेळाडूचा पत्ता कट होऊ शकतो. भारत- अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी म्हटले की, 'वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर अनेकांना संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. यामागे अनेक कारणं होती. मात्र चांगली बाब अशी आहे की, आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत.'

virat kohli rohit sharma
Rohit Sharma Statement: 'आम्हाला त्याची गरज आहे..' शानदार विजयानंतर रोहितने या खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

तसेच ते पुढे म्हणाले की,'आम्हाला काही गोष्टींवर काम करावं लागणार आहे. एक संघ म्हणून आम्हाला तितके सामने खेळायला मिळणार नाहीत. आयपीएल आहे, आमचं खेळाडूंवर लक्ष असेल. आमच्याकडे रिषभ पंत, इशान किशन आणि संजू सॅमसनसारखे पर्याय उपलब्ध आहेत. परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com