Rohit Sharma Statement: 'आम्हाला त्याची गरज आहे..' शानदार विजयानंतर रोहितने या खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

India vs Afghanistan 3rd T20I: या सामन्यात अखेर भारतीय संघाने बाजी मारली आणि मालिका ३-० ने खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा झाला.
rohit sharma
rohit sharmatwitter

Rohit Sharma On Rinku Singh:

तब्बल १४ महिन्यांनंतर टी -२० क्रिकेटमध्ये कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला हवी तशी कामगिरी करत आली नव्हती. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद होऊन परतला. मात्र शेवटच्या सामन्यात त्याने दमदार कमबॅक केलं.

त्याने भारत - अफगाणिस्तान तिसऱ्या टी -२० सामन्यात १२९ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने रिंकू सोबत मिळून १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. दरम्यान दोन वेळा सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात अखेर भारतीय संघाने बाजी मारली आणि मालिका ३-० ने खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा आनंद गगनात मावेनासा झाला.

शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला की, ' मला माहित नाही हे याआधी कधी झालं होतं. मला असं वाटतंय की मी याआधी आयपीएलमध्येही तीन वेळा फलंदाजीसाठी उतरलोय. आमच्यासाठी भागीदारी करणं अतिशय महत्वाचं होतं. रिंकू माझ्यासोबत सतत चर्चा करत होता. २२ वर ४ फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्यावर दबाव होता. त्यामुळेच खेळपट्टीवर टिकून राहणं आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं.' (Latest sports updates)

rohit sharma
Virat Kohli: अद्भुत, अविश्वसनीय! बाऊंड्री लाईनवर डाईव्ह मारत उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण ; video पाहायलाच हवा

तसेच या सामन्यात ६९ धावांची बहुमूल्य खेळी करणाऱ्या रिंकू सिंगचं कौतुक करताना रोहित म्हणाला की, ' आम्हाला त्याच्यासारख्या आक्रमक फलंदाजाची गरज आहे. गेल्या काही मालिकांमध्ये त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे .त्यावरून त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे.' डाव्या हाताच्या या फलंदाजाने आपल्या छोट्याश्या कारकीर्दीत अनेकदा फिनिशरची भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे. ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता. त्यावेळी त्याने रोहितसोबत मिळून १९० धावांची भागीदारी केली. यात त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ६९ धावांचं योगदान दिलं.

rohit sharma
IND vs AFG 3rd T20I: अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! बंगळुरुत असा राहिलाय रेकॉर्ड

एमएस धोनीनंतर भारतीय संघाला एका विश्वासू फिनिशरची गरज होती. जो शेवटी जाऊन मोठे फटके खेळू शकतो. रिंकू सिंगमध्ये ती क्षमता आहे आणि हे त्याने अनेकदा सिद्ध करून दाखवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com