भारत - अफगाणिस्तान तिसऱ्या टी -२० सामन्याचा थरार बंगळुरूत रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे.
तर मालिकेतील अंतिम सामना जिंकून भारतीय संघ अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
कसा राहिलाय रेकॉर्ड?
भारतीय संघाने बंगळुरूत आपला शेवटचा टी -२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. (IND vs AFG News In Marathi)
या मैदानावर भारतीय संघाने पहिला टी -२० सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. २०१२ मध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून धुव्वा उडवला होता. त्यानंतर २०१६ मध्ये बांगलादेश आणि २०१७ मध्ये इंग्लंडला याच मैदानावर धूळ चारली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ७५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
कोणता फलंदाज ठरलाय हीट?
भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे चिन्नास्वामी हे त्याच्यासाठी होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याचा रेकॉर्डही दमदार राहिला आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये ११६ धावा केल्या आहेत.नाबाद ७२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर माजी कर्णधार एमएस धोनीने ४ सामन्यांमध्ये ११० धावा केल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.