Rishabh Pant: रिषभ पंतची नेट्समध्ये तुफान फटकेबाजी! मैदानात केव्हा परतणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Rishabh Pant Nets Practice: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
rishabh pant
rishabh pantsaam tv news
Published On

Rishabh Pant Nets Practice Photos:

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पंत कमबॅक केव्हा करणार? पंत आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप खेळणार का?असे अंसख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. ज्यात रिषभ पंत फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे.

रिषभ पंतचा कसून सराव..

सध्या रिषभ पंत बंगळुरुतील एन चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव करतोय. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रिषभ पंत फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. त्याचा हा फोटो वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.

त्याच्या या फोटोवर क्रिकेट फॅन्स प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काहींचं म्हणणं आहे की, रिषभ पंत लवकरच भारतीय संघात कमबॅक करु शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दुर आहे. (Latest sports updates)

rishabh pant
IND vs AFG 3rd T20I: भारत- अफगाणिस्तान अंतिम सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

अशी राहिलीये कारकिर्द..

रिषभ पंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३० वनडे, ६६ टी-२० आणि ३३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधील ३३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ४३.६७ च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत.

तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३० सामन्यांमध्ये ३४.६ च्या सरासरीने ८६५ धावा केल्या आहेत. त्याच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ६६ टी-२० सामन्यांमध्ये ९८७ धावा केल्या आहेत.

तो आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाच प्रतिनिधित्व करतो. माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, रिषभ पंत आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

rishabh pant
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com