भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम टी -२० सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यासह टी -२० मालिका ३-० ने जिंकली आहे. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विराटचं उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण...
तर झाले असे की, अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला होता. त्यावेळी करिम जनत फलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर करिम जनतने मोठा फटका मारला.
हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर ६ धावांसाठी जात होता. मात्र त्याचवेळी विराट कोहलीने उडी मारली आणि चेंडू अडवला. त्याचा तोल गेला त्यामुळे त्याने चेंडू मैदानाच्या आत फेकला. यासह त्याने आपल्या संघासाठी ५ धावा वाचवल्या. त्याचं हे क्षेत्ररक्षण पाहून कर्णधार रोहितसह कोच राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनीही त्याचं कौतुक केलं. (Latest sports updates)
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा विजय..
या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना डबल सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने या सामन्यात अटीतटीची लढत दिली. मात्र शेवटी भारतीय संघाने बाजी मारत हा सामना जिंकला.
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळली गेली. पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यानंतर दुसऱ्यांदा सुपर ओव्हर झाली. या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ११ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यात अफगाणिस्तानचा संघ अपयशी ठरला. यासह भारतीय संघाने हा सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.