बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला तिसरा भारत आणि अफगाणिस्तानमधील तिसरा टी सामना कोट्यवधी चाहत्यांच्या स्मरणात राहील. सामन्याने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवले. दोनदा सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना भारतीय संघाने शानदारपणे जिंकलाय. या विजयासह भारताने अफगाणितास्तानला टी२० सामन्यांच्या मालिकेत व्हाइट वॉश दिलाय. (Latest News)
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अपगाणिस्तानने भारतासमोर १७ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पेलाताना भारतीय संघाने बराबरी साधली. त्यानंतर दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने ११ धावा करत अफगाणिस्तान संघाला १२ धावांचे आव्हान दिले. त्यावेळी रवि बिश्नोईच्या जाळ्यात अफगाणिस्तानचे फलंदाज अडकले. अवघ्या तीन चेंडूमध्येच भारताने सामना जिंकला. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव करून, तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हॉइट वॉश दिलाय. कर्णधार रोहित शर्मानं ट्वेन्टी ट्वेन्टीत झळकावलेले पाचवे शतक आणि रिंकू सिंगसोबत रचलेली १९० धावांच्या भागीदारी भारताच्या सलग तिसऱ्या विजयात निर्णायक ठरली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला २१३ धावांचं आव्हान दिलं. परंतु अफगाणिस्तानच्या गुलबदीन नायकच्या अर्धशतकी खेळीमुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. यामुळे हा सामना अनिर्णायक ठरला. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावा कुटल्या. हे आव्हान पेलताना भारताने १६ धावा करत सुपरओव्हरमध्ये अनिर्णायक राहिला. त्यानंतर दुसरी सुपरओव्हर करण्यात आली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने बाजी मारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.