भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेगवान सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकात संघाला दोन मोठे धक्के बसले. टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का विराट कोहलीच्या रुपात मिळाला. विराट कोहली गोल्डन डकचा शिकार झाले. विराट कोहलीचं टी २० सामन्यात १४ वर्षाचं करिअर आहे. या संपूर्ण १४ वर्षाच्या करिअरमध्ये कोहलीसोबत हे पहिल्यांदा घडलं. (Latest News)
भारतीय कर्णधार (Indian captain) रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने (Team India) आक्रमक सुरुवात केली परंतु त्यानंतर दोन धक्के मिळाले. दरम्यान २० षटकात भारताने ४ विकेट गमावत २१२ धावा करत अफगाणितास्तानच्या संघाला २१३ धावांचे आव्हान दिलं. त्यानंतर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने हा सामना बरोबरीत सोडवला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विराट कोहलीने (Virat kohali) २०१० मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो ११७ सामने खेळला आहे. त्याच्या या १४ वर्षांच्या करिअरमध्ये विराट पहिल्यांदाच गोल्डन डकवर आऊट झाला. त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही १०९ वी इनिंग होती. या फॉरमॅटमधील हा त्याचा पाचव्यांदा गोल्डन डक होता, पण या फॉरमॅटमध्ये तो पहिल्यांदाच गोल्डन डकवर आऊट झाला.
विराट कोहलीने ११७ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१.७ च्या सरासरीने ४०३७ धावा केल्या. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनलाय. आंतरराष्ट्रीय टी २०मध्ये त्याच्या नावावर ३७ अर्धशतके आणि एक शतक आहे. या सामन्यात विराटने ६ धावा केल्या असत्या तर तो टी- २० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणारा पहिला भारताचा खेळाडू ठरला असता. पण तो हे करू शकला नाही. आता त्याची संघात निवड झाल्यास तो थेट टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.