IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

India vs Afghanistan Super Over Video: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी -२० मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले होते. मात्र मालिकेचा शेवट असा होईल असं कोणालाच वाटलं नसेल
team india
team indiaX/BCCI
Published On

IND vs AFG 3rd T20I Super Over Video:

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी -२० मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले होते. मात्र मालिकेचा शेवट असा होईल असं कोणालाच वाटलं नसेल. भारतीय संघाने २०० पेक्षा अधिक धावा केल्या त्यावेळी वाटत होती की, भारतीय संघ या संमुत एकतर्फी विजय मिळवणार.

मात्र अफगाणिस्तानने झुंज देत सामना बरोबरीत संपवला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करता असताना अवघ्या २२ धावांवर भारताचे ४ फलंदाज माघारी परतले होते.

इथून रिंकू सिंग आणि रोहित शर्मा यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी १९० धावा जोडल्या. यादरम्यान रोहित शर्माने १२९ तर रिंकू सिंगने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २१२ धावांपर्यंत मजल मारली.

team india
Rohit Sharma Statement: 'आम्हाला त्याची गरज आहे..' शानदार विजयानंतर रोहितने या खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

अफगाणिस्तानकडून धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १९ धावांची गरज होती. गुलबदिनने १८ धावा करत सामना टाय केला. (Latest sports updates)

पहिल्या सुपर ओव्हरचा थरार..

भारतीय संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी मुकेश कुमार गोलंदाजीला आला होता. तर गुलबदिन आणि नबी यांची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून ६ चेंडूत १६ धावा कुटल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ६ चेंडूत १७ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि जयस्वालने चांगली सुरुवात केली. शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला जिंकण्यासाठी २ धावेची गरज होती. मात्र यशस्वी जयस्वाल केवळ १ धाव करू शकला.

team india
Rohit Sharma Batting: हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास, असा कारनामा करणारा जगातील पहिलाच खेळाडू

दुसऱ्या सुपर ओव्हरचा थरार..

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला. रोहितने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत अप्रतिम सुरुवात केली. मात्र पुढील २ चेंडूवर २ विकेट्स पडल्या. त्यामुळे भारतीय संघाला १० धावांवर समाधान मानावं लागलं. या १० धावांचा बचाव करण्यासाठी रवी बिष्णोई गोलंदाजीला आला. मात्र त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. त्याने सुरूवातीच्या ३ चेंडूत २ गडी बाद करत संघाला सामना जिंकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com