SA T20 League: विश्वासच बसेना! रोमारीयो शेफर्डने टिपला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल; Video

Romario Shepherd Catch: सध्या दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिका टी -२० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत जोबर्ग सुपर किंग्ज संघातील खेळाडू रोमारीयो शेफर्डने एक भन्नाट झेल टिपला आहे
Romario Shepherd Catch
Romario Shepherd Catchtwitter
Published On

Romario Shepherd Catch Video:

सध्या दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिका टी -२० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत जोबर्ग सुपर किंग्ज संघातील खेळाडू रोमारीयो शेफर्डने एक भन्नाट झेल टिपला आहे, जो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. त्याने एका हाताने टिपलेल्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोमारीयो शेफर्ड लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू आपल्याकडे येतोय हे पाहून तो डाइव्ह मारतो अणि एका हाताने भन्नाट झेल टिपतो. हवेत झेल टिपल्यानंतर तो जमिनीवर आपटतो. हा झेल पाहून समालोचकांनाही विश्वास बसत नाही. झेल टिपताच समालोचकांच्या तोंडून एकच आवाज येतो तो म्हणजे अविश्वसनीय. (Cricket News In Marathi)

Romario Shepherd Catch
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

हा झेल टिपत त्याने डर्बन सुपर जायंट्स संघातील मॅथ्यू ब्रीट्ज़केला बाद करत माघारी धाडलं. ब्रीट्ज़केने गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण शेफर्डने अचूक टायमिंग आणि योग्य वेळी डाइव्ह मारली. त्याचा हा झेल पाहून गोलंदाजी करत असलेल्या नांद्रे बर्गरलाही विश्वास बसत नव्हता.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर , डर्बन सुपर जायंट्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डर्बनने ८ गडी बाद १४५ धावा केल्या. यादरम्यान हेनरिक कलासेनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले.

Romario Shepherd Catch
Rohit Sharma Statement: 'मी आधीच सांगितलं होतं की...', अफगाणिस्तानला धूळ चारताच रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जोबर्ग सुपर किंग्ज संघाला २० षटक अखेर ९ गडी बाद १०८ धावा करता आल्या. या संघाकडून फलंदाजी करताना रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने ३६ धावा केल्या. मात्र सुपर किंग्जचा संघ विजय मिळावी शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com