अफगाणिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं टी २० वर्ल्डकपकडे लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या चमूबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी २० सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मानं बोलता बोलता टी २० वर्ल्डकपसाठी भारताच्या संभाव्य संघ कसा असेल याचे संकेत दिले आहेत.
टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा १ ते २९ जून या कालावधीत होणार आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ हा या स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
कोणत्याही मोठ्या स्पर्धेत उतरण्याआधी भारतीय संघाच्या तयारीआधी संघ निवडीचीच अधिक चर्चा होते. रोहित शर्मा याने आपल्या संघाची निवड केली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. टी २० वर्ल्डकपसाठी भारताचा संभाव्य संघ कसा असेल याचे संकेत रोहित शर्माने बेंगळुरूमध्ये झालेल्या टी २० सामन्यानंतर दिले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धची टी २० मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मानं वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले आहे. जेतेपदासाठी काय तयारी केलीय यावरही त्यानं अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. अद्याप १५ खेळाडूंची नावं अंतिम केली नाहीत. मात्र, आठ ते दहा खेळाडू असे आहेत ते या वर्ल्डकपसाठीच्या संघामध्ये असू शकतात, असं तो म्हणाला.
भारताच्या संभाव्य संघ निवडीबाबत रोहित शर्मानं महत्वाचं विधान केलं आहे. परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल, असं रोहित शर्मा म्हणाला. वेस्ट इंडीजमध्ये कंडिशन स्लो असते. ते बघूनच संघ निवडला जाईल, असेही तो म्हणाला.
रोहित शर्माने टीम इंडियाबाबत केलेल्या वक्तव्यानं संभाव्य संघ कसा असेल याचे अंदाज बांधले जात आहेत. रोहित शर्मानं जवळपास १० खेळाडूंची नावं निश्चित केलेली असावीत. उर्वरित पाच खेळाडूंच्या नावांवर खल होण्याची शक्यता आहे. तर निवड समिती ही वेस्ट इंडीजच्या कंडीशनवर लक्ष ठेवून असेल. त्यानंतर संघ निवड केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.