T20 World Cup 2024: शिवम दुबे की हार्दिक पंड्या? दिग्गज खेळाडूने सांगितलं टी -२० वर्ल्डकपमध्ये कोणाला मिळणार स्थान

Hardik Pandya vs Shivam Dube: टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या की शिवम दुबे? कोणाला जास्त प्राधान्य दिलं जाईल? याबाबत माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.
shivam dube and hardik pandya
shivam dube and hardik pandyatwitter
Published On

Zaheer Khan On Hardik Pandya And Shivam Dube:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जात आहे. शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी आणि धारदार गोलंदाजी करून दाखवून दिलं आहे की, आपणही कोनापेक्षा कमी नाही.

हार्दिक पंड्याचं कमबॅक झाल्यानंतर शिवम दुबेला संघात स्थान मिळणार का? टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या की शिवम दुबे? कोणाला जास्त प्राधान्य दिलं जाईल? असे असंख्य प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान दिग्गज भारतीय खेळाडूने हे कोडं सोडवलं आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या जहीर खानचं म्हणणं आहे की, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या दोंघांनाही संघात स्थान मिळू शकतं. भारतीय संघ ५ गोलंदाजांसह मैदानात उतरणार की सहाव्या ऑप्शनसह मैदानावर जाणार यावर सर्व अवलंबून असणार आहे. मात्र त्याच्या मते दोघांनाही प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. (Latest sports updates)

shivam dube and hardik pandya
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

काय म्हणाला जहीर खान?

संघात कोणाला स्थान मिळू शकतं याबाबत बोलताना जहीर खान म्हणाला की, ' तुम्ही जर सहावा पर्यायी गोलंदाज किंवा बॅकअप म्हणून खेळत असाल तर दोघांनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकतं. मात्र त्यासाठी तुम्ही २ यष्टिरक्षकांऐवजी एका यष्टिरक्षकासह मैदानात उतरावं लागेल.'

shivam dube and hardik pandya
Rohit Sharma: सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित बाहेर का गेला? खरं कारण आलं समोर

नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये शिवम दुबेने तुफानी अर्धशतकं झळकावली. यासह गोलंदाजी करताना विकेट्सही काढून दिल्या. या कामगिरीच्या बळावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com