Shivam Dube: अरे....हा तर ज्युनिअर युवराज! शिवम दुबेचे सलग ३ चेंडूंवर ३ गगनचुंबी षटकार, VIDEO

Shivam Dube Sixes Video: भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालने जोरदार हल्लाबोल केला.
Shivam Dube Sixes Video
Shivam Dube Sixes Videosaam tv news
Published On

Shivam Dube News In Marathi:

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना इंदुरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. सलग २ सामने जिंकत भारतीय संघाने टी-२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

सलग २ सामन्यांमध्ये २ अर्धशतकं झळकावणारा शिवम दुबे या सामन्याचा हिरो ठरला आहे. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने या सामन्यातही अवघ्या ३२ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.

षटकारांची हॅटट्रिक..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालने जोरदार हल्लाबोल केला. या दोघांच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने हे आव्हान १५ षटकात पूर्ण केलं. (Shivam Dube Sixes Video)

अफगाणिस्तानकडून १० वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद नबी गोलंदाजीला आला होता. दुबेने या षटकात त्याचा चांगलाच समाचार घेतला. या षटकातील दुसऱ्या,तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने षटकार मारत षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली. (Latest sports updates)

Shivam Dube Sixes Video
Rohit Sharma: रोहित शर्माने घातली नव्या विक्रमाला गवसणी; आगळीवेगळी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

शिवम दुबेची अष्टपैलू कामगिरी..

शिवम दुबेला अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत २ अर्धशतकं झळकावली आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना मोहालीच्या मैदानावर पार पडला होता.

या सामन्यात त्याने २ षटकात ९ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. त्यानंतर फलंदाजी करताना त्याने ४० चेंडूत ६० धावांची खेळी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला होता.

Shivam Dube Sixes Video
IND vs AFG: शिवम सुंदरम् ... ! दुबेच्या अष्टपैलू खेळीनं टीम इंडियानं अफगाणिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

तर मालिकेतील दुसरा सामना इंदुरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना त्याने अवघ्या ३२ चेंडूंचा सामना करतक ६३ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. अफगाणिस्तानविरुद्धच्या २ सामन्यांमध्ये त्याने १२३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com