भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेचा दुसरा टी-२० सामना खेळताना नवा विक्रम केला आहे. रोहित शर्माने १४ महिन्यानंतर टी-२० सामना खेळत नव्या विक्रमाला गवसणवी घातली आहे. रोहित शर्मा टी-२० फॉरमॅटमध्ये १५० सामना खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. (Latest Marathi News)
रोहित शर्माने १४ महिन्यानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन केलं आहे. एकदिवसीय विश्वचषक झाल्यानंतर पहिल्यांदाच रोहित टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने या मालिकेचा पहिला सामना मोहालीमध्ये खेळला. रोहितने १४ महिन्यानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून संघात परतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रोहित शर्माच्या नावावर टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत १८२ षटकार ठोकले आहेत. तसेच रोहितने या फॉरमॅटमध्ये ३८५३ धावा ठोकल्या आहेत. रोहित सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.
मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने टीम इंडियाविरुद्ध १७२ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शिवम दुबेने एक गडी बाद केला. अफगाणिस्तानच्या गुलबदीने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर या सामान्यात टीम इंडियाने ६ गडी राखून अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.