Sachin Tendulkar: 'माझ्या आईने शाळेपासून माझी कोणतीच मॅच पाहिली नाही, पण...'; सचिन तेंडुलकरने सांगितला भावनिक किस्सा

Sachin Tendulkar Latest news: माझ्या आईने शाळेपासून कोणतीच मॅच पाहिली नाही, पण शेवटची कसोटी मॅच आईने पाहिली, असा भावनिक किस्सा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने उपस्थितांना सांगितला.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarSaam tv
Published On

सुनील काळे, मुंबई

Sachin Tendulkar Latest News:

'मला माझ्या आईने खूप सहकार्य केलं आहे. मी लहानपणी खूप मस्ती करायचो. माझ्या आईने शाळेपासून कोणतीच मॅच पाहिली नाही, पण शेवटची कसोटी मॅच आईने पाहिली, असा भावनिक किस्सा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने उपस्थितांना सांगितला. (Latest Marathi News)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाश पार्सेकर यांनी काढलेल्या फोटोंचं पुस्तक प्रकाशन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सचिनने हजेरी लावत उपस्थितांना संवाद साधताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सचिन तेंडुलकर उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाला की, 'कसोटीत पहिल्यांदा १०० धावा केल्या. त्यावेळी माझ्या मित्रांनी एअरपोर्टवर स्वागत केले. मी आणि अजित क्रिकेट खेळायचो. मला 80च्या दशकात आई-वडिलांनी क्रिकेट खेळू दिले. माझं अभ्यास करताना डोके दुखायचं'.

आईचा किस्सा सांगताना सचिन भावुक

'माझ्या आईने खूप सहकार्य केलं. माझा कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. माझ्यासाठी तो भावुक क्षण होता. माझ्या आईला त्यावेळी स्क्रिनवर दाखवलं. त्यावेळी घरातील सर्वांना स्क्रिनवर दाखवलं. आईने शाळेपासून माझी कोणतीच मॅच पाहिली नाही, पण ही शेवटची कसोटी मॅच आईने पाहिली, असं भावनिक क्षण सचिनने सांगितला.

सचिनने सांगितली आचरेकर सरांची आठवण

दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची आठवण सांगताना सचिन म्हणाला की, सर त्यावेळी 7 रुपये फी घेत असत. त्यानंतर त्यांनी 11 रुपये फी केली. पण काहींना ती देणे शक्य नव्हती. त्यामुळे आचरेकर त्यांच्याकडून फी घेत नव्हते. आचरेकर सर खुश झाले की मला वडापाव खाऊ घालायचे. मला जेव्हा भारतरत्न मिळाला, तेव्हा मी सरांना दाखवयाला गेलो. तेव्हा सरांच्या डोळ्यातून मला 'वेल डन' कळलं'.

क्रिकेट दौऱ्यामुळे बायकोचा वाढदिवस करता आला नाही : सचिन तेंडुलकर

'क्रिकेट दौऱ्यामुळे अनेकदा मला अंजलीचा वाढदिवस साजरा करता आला नाही. मी श्रीलंकेतून आलो, त्यावेळी सारा 11 महिन्याची होती. मी घरी आल्यानंतर मला साराने ओळखलंही नाही, कारण मी तेथील उन्हाने करपलो होतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com