
India vs Afghanistan T20 Match:
इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने मालिकेचा दुसरा सामना खिशात टाकत मालिकाही जिंकली आहे. यशस्वी जैयस्वाल आणि शिवम दुबेच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला आहे. (Latest Marathi News)
अफगाणिस्ताने टीम इंडियाला २० षटकात १७३ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने ६ गडी राखून लक्ष्य गाठलं. टीम इंडियाने अवघ्या १५.३ षटकात अफगाणिस्तानने दिलेले आव्हान यशस्वीपणे गाठलं. अफगाणिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत दुसरा सामना जिंकत मालिकेवरही नाव कोरलं आहे
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने अर्धशकती खेळी खेळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने ३४ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने या डावात ५ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर दुबेने ३२ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. त्याने या डावात ५ चौकार आणि ४ षटकार लगावले.
भारताची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा शून्य धावांवर बाद झाला. रोहितला फजलहकने त्रिफळाचित केले. कोहलीनेही फारशी कमाल केली नाही. कोहलीने ५ चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. जितेश शर्माही शून्य धावांवर बाद झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. मात्र नायबने संघाची कमान सांभाळली. त्याने संघासाठी सर्वाधिक ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. नजीबुल्लाहने २३, मुजीब उर रहमानने २१ तर करीमने २० धावा केल्या. तसेच अर्शदीपने टीम इंडियासाठी ३ गडी बाद केले. रवि बिश्नोई आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.