भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच ही चर्चा सुरू असते की, संजू सॅमसनला संधी मिळत नाही. नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
येत्या जून महिन्यात भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ शेवटची टी -२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन शून्यावर बाद होऊन माघारी परतला. या सुमार कामगिरीमुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या जितेश शर्माने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांची मन जिंकली आहेत. संजू सॅमसनबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०१५ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याला केवळ ४१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. (Latest sports updates)
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करत संजू सॅमसनने भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. तो २०१५ मध्ये आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. या ९ वर्षांमध्ये त्याला केवळ ४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. मात्र तो सातत्याने चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
त्याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १६ वनडे सामन्यांमध्ये ५१० धावा केल्या आहेत. ज्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर २५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला केवळ ३७४ धावा करता आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.