आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी तयारी करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच दुबईत आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनला १.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. सध्या तो बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान मेलबर्न स्टार्स संघाविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. (Tom Curran Ruled Out)
टॉम करनला बिग बॅश लीग स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत त्याला केवळ ४ गडी बाद करता आले आहेत. दरम्यान अंपायरसोबत गैरवर्तण केल्याप्रकरणी त्याला ४ सामन्यांसाठी निंलबितही करण्यात आलं होतं. (Cricket News In Marathi)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी काही धक्कादायक निर्णय घेतले होते. त्यांनी संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला संघाबाहेर केलं. त्यानंतर वनिंदु हसरंगाला देखील बाहेरची वाट दाखवली.
असं म्हटलं जात होतं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएलच्या लिलावात मिचेल स्टार्क किंवा कोएट्जीला टार्गेट करु शकतात. मात्र असं काहीच झालं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अल्जारी जोसेफला ११.५० कोटी आणि यश दयालला ५ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिलं. या संघात असा एकही विश्वासु गोलंदाज नाही. आता टॉम करन बिग बॅशमधून बाहेर गेल्यानंतर आयपीएल स्पर्धेतूनही माघार घेऊ शकतो. त्यामुळे हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.