Sunil Gavaskar On Sanju Samson: 'संजूच्या करियरचा हा टर्निंग पॉईंट..' दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खेळीनंतर दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

Sunil Gavaskar Statement: या सामन्यात संजू सॅमसनने शतकी खेळी केली आहे. दरम्यान या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सूनील गावसकर यांनी संजू सॅमसनचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
sanju samson
sanju samsongoogle
Published On

Sunil Gavaskar On Sanju Samson:

भारत- दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील निर्णायक सामना २१ डिसेंबर रोजी पार्लच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर होता.

त्यावेळी संजू सॅमसनने आपल्या शतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या २९६ धावांपर्यंत पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सूनील गावसकर यांनी संजू सॅमसनचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाज संघर्ष करताना दिसून येत होते. अशा खेळपट्टीवर संजू सॅमसनकडून संयमी खेळी पाहायला मिळाली. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत १०८ धावांची खेळी केली.

संजू सॅमसनचं क्रिकेट करियर एका रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नाही. त्याने ८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. सुरुवातीला त्याला केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली.

त्यानंतर त्याला संधी मिळाली, मात्र तो स्वत:ला सिद्ध करु शकला नव्हता. अखेर ४० सामन्यांनंतर त्याने आपल्या वनडे करियरचं पहिलं शतक झळकावलं आहे. आतापर्यंत त्याला अनेकदा चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नव्हता. (Latest sports updates)

sanju samson
Ind vs Sa 3rd ODI: टीम इंडियाने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला जगातील दुसराच संघ

सुनील गावसकरांनी केलं कौतुक..

सुनील गावसकरांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की,'या खेळीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे,संजूचं शॉट सिलेक्शन. आतापर्यंत अनेकदा त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नव्हता. मात्र आज तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही. तो खराब चेंडूची वाट पाहत होता. त्यानंतर त्याने आपलं शतक पूर्ण केलं. मला असं वाटतं की हा त्याच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरेल. या शतकी खेळीमुळे त्याला यापुढेही संधी मिळेल.'

तसेच ते पुढे म्हणाले की,'दुसरी गोष्ट म्हणजे, त्याचा आत्मविश्वास वाढेल. कधी- कधी तुम्हाला माहित असतं की तु्म्ही एखादी गोष्ट करु शकता पण नशीब साथ देत नाही. ही शतकी खेळी त्याला विश्वास देऊन जाईल की हा खेळाडू याच लेव्हलवर खेळण्यासाठी बनला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की, तो प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र तो स्वत:ला सिद्ध करु शकला नव्हता.'

sanju samson
KL Rahul Statement: 'मी खेळाडूंना हेच सांगितलं होतं की..', वनडे मालिका जिंकल्यानंतर केएल राहुलने सांगितला काय होता प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com