MS Dhoni : थला ऑफ नो रिजन, चिल्लीपिल्ली पोरांनीही धोनीची खिल्ली उडवली, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

MS Dhoni Trolling Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लहान मुलं चेन्नई सुपर किंग्सचा सामना पाहिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे.
MS Dhoni Trolling Viral Video
MS Dhoni Trolling Viral Videox
Published On

IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सने ११ एप्रिल रोजी चेपॉकच्या स्टेडियवर चेन्नई सुपर किंग्सचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने १०३ धावा केल्या. हा चेन्नईचा आयपीएल २०२५ मधला सलग पाचवा पराभव होता. या सीझनमध्ये सीएसकेचा खराब फॉर्म सुरु आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ पॉईंट्स टेबलवर दहाव्या क्रमांकावर आहे.

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. एमएस धोनीने या सामन्यात १ धाव करुन माघारी परतला. गरज असताना अपेक्षाभंग केल्याने धोनीवर टीका करण्यात आली. फक्त धोनीच नाहीतर संपूर्ण चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला ट्रोल करण्यात आले. फक्त तरुण, वयस्करच नाहीतर लहान-लहान मुलेदेखील सीएसकेला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

MS Dhoni Trolling Viral Video
CSK मध्ये वादाची ठिणगी? धोनी कर्णधार होताच ऋतुराजचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील कृतीतून चित्रच समोर आलं

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन-तीन लहान मुलं सीएसकेचे सामने पाहायला जाऊ नका असे म्हणत असल्याचे पाहायला मिळते. त्यातली एक मुलगी म्हणते, 'चेन्नई सुपर किंग्सचे सामने पाहायला जाऊ नका. ते लोक वेडे आहेत. त्यांनी कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे आणि त्याचा मला राग आहे. माझ्या कुटुंबामध्ये १७ सदस्य आहेत. आम्ही चेन्नईचा सामना पाहायला जाऊन आमचे ५५,००० रुपये वाया घालवले. थला फॉर नो रिजन. धोनी थला फॉर नो रिजन. तो फार वाईट आहे. सीएसकेचा सामना पाहायला जाऊन तुम्ही तुमचे पैसै वाया घालवू नका. प्लीज तुम्ही जाऊ नका.'

MS Dhoni Trolling Viral Video
SRH VS PBKS : हैदराबादच्या विजयात गुजरातचा हात? अभिषेक शर्माने वादळी खेळी करताना कुणाची बॅट वापरली? विजयानंतर मोठा ट्विस्ट

पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ पॉईंट्स टेबलवर सर्वात खालच्या स्थानी आहे. धोनीचा फॉर्म, फलंदाजीची खराब सुरुवात, मध्यम फळीकडून गरजेप्रमाणे न होणारा खेळ असे अनेक प्रश्न चेन्नईसमोर आहेत. यापुढचा एकही सामना जर चेन्नई सुपर किंग्सने गमावला, तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी हुकेल असे म्हटले जात आहे.

MS Dhoni Trolling Viral Video
Ricky Ponting : पंजाब किंग्सच्या खेळाडूंमुळे रिकी पाँटिंगवर 'कचरा' गोळा करण्याची वेळ; Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com