
IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने निराशाजनक कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाड कोपराच्या फॅक्चरने दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी महेंद्रसिंह धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याच दरम्यान गायकवाड आणि धोनी यांच्या वाद सुरु असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये ऋतुराज गायकवाडने महेंद्रसिंह धोनीला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचे म्हटले आहे. ऋतुराजच्या फॉलोइंग लिस्टमध्ये धोनीचे अकाउंट नसल्याचेही पोस्टमध्ये पाहायला मिळते. दरम्यान गायकवाड याआधी धोनीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होता की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. तरीसुद्धा एमएस धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार बनल्यानंतर गायकवाडने धोनीला अनफॉलो केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
३० मार्च रोजी राजस्थान विरुद्ध चेन्नई या सामन्यात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला होता. कोपराच्या हेअरलाईन फॅक्चरमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पण ऋतुराज गायकवाडचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ऋतुराजच्या दुखापतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याला कर्णधारपदावरुन काढण्याचा हा प्लान केला असल्याचे काहीजण म्हणत आहेत.
आयपीएल २०२४ नंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती. त्याआधी महेंद्रसिंह धोनीकडे सीएसकेचे नेतृत्त्व होते. धोनीच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईच्या संघाने ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. आयपीएलच्या इतिहासातला धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.