
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधला महामुकाबला काल (१२ एप्रिल) रोजी खेळला गेला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाबने एकूण २४५ धावा केल्या. २४६ चे आव्हान गाठताना सनरायजर्स हैदराबादच्या संघाने २४७ धावा केल्या. अभिषेक शर्माच्या अद्वितीय खेळीमुळे हैदराबादने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करत असताना पंजाबने २० ओव्हर्समध्ये २४५ धावा केल्या होत्या. हैदराबादची मागील काही सामन्यातील फलंदाजी पाहता महाकाय लक्ष गाठणे हैदराबादला शक्य होणार नाही असे काहीजणांनी म्हटले. पण हैदराबादच्या खेळाडूंनी अशक्य वाटणारे आव्हान सहज शक्य करुन दाखवले. अभिषेक शर्माने ५५ बॉल्समध्ये १४१ धावा करत विक्रम रचला. त्याला ट्रेव्हिस हेडची साथ मिळाली.
हैदराबाद विरुद्ध पंजाब हा सामना पाहण्यासाठी अभिषेक शर्माचे आईवडील स्टेडियमवर पोहोचले होते. हैदराबादच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिषेक आणि त्याच्या आईवडिलांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. अभिषेकच्या खेळाबद्दल बोलताना अभिषेकचे आईवडील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या बॅटने १४१ धावा केल्या, ती बॅट दुसऱ्या खेळाडूची असल्याचे अभिषेकने सांगितले.
अभिषेक शर्मा म्हणाला, 'मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो. हैदराबादचा शेवटचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होता. आणि तुम्हा सर्वांना ठाऊक असेल मी पुन्हा एकदा कुणाची बॅट मागितली असेल... तुझी बॅट मला दिल्याबद्दल थँक्यू शुबमन. मला ऑरेंज आर्मीसाठी काहीतरी करायचे होते असे मी त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते. कालचा दिवस माझ्यासाठी लकी ठरला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.