Ajinkya Rahane Comeback: माही है तो मुमकीन है! अजिंक्य रहाणेचं टीम इंडियात जोरदार पुनरागमन

Ajinkya Rahane Comeback In Team India: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे.
ajinkya rahane
ajinkya rahane saam tv
Published On: 

WTC Final Squad: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हलमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी काही दिवसांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली होती.

आज बीसीसीआयने देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामान्यासाठी भारतीय संघाचाही घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. (Ajinkya Rahane Comeback In Team India)

अजिंक्य रहाणे हा भारतीय संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेकदा महत्वाची खेळी केली आहे. इतकेच नव्हे तर भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलिया संघाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभूत करण्याचा विक्रम देखील केला आहे.

मात्र फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला उपकर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, त्याला संघाबाहेर देखील केले गेले होते. जानेवारी २०२२ मध्ये तो शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर तो संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

ajinkya rahane
Team India WTC Final Squad: 'अजिंक्य' तारा परतला, तर सूर्य मावळला; WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा

धोनीमुळे झाले कमबॅक?

अजिंक्य रहाणेला आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५० लाखांची किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिले होते. सुरुवातीला त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र जेव्हा संधी मिळाली त्यावेळी त्याने तुफानी अर्धशतक झळकावत जोरदार कमबॅक केले होते. या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. हाच आत्मविश्वास त्याने पुढे कायम ठेवला. आतापर्यंत त्याने या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये २०९ धावा केल्या आहेत.

ajinkya rahane
Ajinkya Rahane Comeback: मुंबईकरच घेणार मुंबईकराची जागा! WTC च्या फायनलसाठी BCCI चा मास्टरप्लॅन तयार

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ७१ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने एमएस धोनीबाबत म्हटले होते की, 'या हंगामात माझ्या सर्व इनिंगचा आनंद लुटला आहे. मला वाटते की माझी सर्वोत्कृष्ट खेळी येणे अजूनही बाकी आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात खूप काही शिकायला मिळाले. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियासाठी खेळणे आणि आता CSK साठी खेळणे, ही अविस्मरनीय बाब आहे. एमएस धोनी अशी व्यक्ती आहे ज्याचे तुम्हाला नेहमी ऐकायला आवडेल.' (Latest sports updates)

ajinkya rahane
Ajinkya Rahane Catch Video: तोच दरारा तीच दहशत! वयाच्या ३४ व्या वर्षी हवेत झेपावत रहाणेने केला 'मॅच विनींग' सेव्ह

WTC सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com