Team India WTC Final Squad: 'अजिंक्य' तारा परतला, तर सूर्य मावळला; WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा

Indian Team Squad For WTC Final: बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Team India
Team IndiaSaam TV
Published On

WTC Final Squad: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना बलाढय ऑस्ट्रेलिया संघासोबत रंगणार आहे. हा सामना ७ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या रोमांचक सामन्यात कोणता संघ विजय मिळवणार यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात काही खेळाडूंचे कमबॅक झाले आहे. तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे .

Team India
Ajinkya Rahane Catch Video: तोच दरारा तीच दहशत! वयाच्या ३४ व्या वर्षी हवेत झेपावत रहाणेने केला 'मॅच विनींग' सेव्ह

अजिंक्य रहाणेचे जोरदार कमबॅक..

या सामन्यासाठी भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) देखील संधी देण्यात आली आहे. त्याला सूर्यकुमार यादवच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला भारतीय कसोटी संघात ५ व्या क्रमाकांवर खेळण्याची संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करत अजिंक्य रहाणेने जोरदार कमबॅक केले आहे. तो जानेवारी २०२२ पासून संघाबाहेर आहे. ( Team India WTC Final Squad)

Team India
Ajinkya Rahane Records: तो 'अजिंक्य' आहे.. रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग खेळत रहाणेचे दमदार कमबॅक

हे खेळाडू झाले बाहेर...

भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्टेलिया संघाला २-१ ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या भारतीय संघातून काही खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane Comeback) कमबॅक होताच सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सूर्याला श्रेयस अय्यरच्या जागी संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आणखी काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला देखील या संघात स्थान देण्यात आले नाहीये. (Latest sports updates)

Team India
Team India News: यंदा वर्ल्डकप टीम इंडियाचाच! BCCI ने आखलाय खास प्लॅन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India WTC final Squad) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com