Ajinkya Rahane Catch Video: तोच दरारा तीच दहशत! वयाच्या ३४ व्या वर्षी हवेत झेपावत रहाणेने केला 'मॅच विनींग' सेव्ह

Ajinkya Rahane Outstanding Fielding: यावेळी आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर आपल्या फिल्डिंगमुळे चर्चेत आला आहे.
ajinkya rahane
ajinkya rahanesaam tv

RCB VS CSK IPL 2023: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ म्हणजे वरिष्ठ खेळाडूंचा संघ. या संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे फिल्डिंग हा नेहमीच या संघाचा वीक पॉईंट राहिला आहेत.

या संघात सुरेश रैना, माईक हसी आणि फाफ डू प्लेसिस सारखे काही दिग्गज फिल्डर्स होऊन गेले आहेत. आता या यादीत आणखी एका दिग्गज खेळाडूची भर पडली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघातील फलंदाज अजिंक्य रहाणे यावेळी आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर आपल्या फिल्डिंगमुळे चर्चेत आला आहे.

ajinkya rahane
Virat Kohli Fined: गांगुली वादानंतर विराटच्या अडचणीत वाढ! आता BCCI ने केली मोठी कारवाई

सोमवारी एम चिन्नास्वामीच्या मैदानावर Royal Challengers Bangalore आणि Chennai Super Kings या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पार पडला. या हाय स्कोरिंग सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला.

दरम्यान ३४ वर्षीय अजिंक्य रहाणेने अप्रतिम फिल्डिंग करत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ajinkya rahane
Fights In IPL: मुबंईच्या मैदानावर दिल्लीकरांचा तुफान राडा! सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

तर झाले असे की , १० वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला होता. तर ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होता. त्यावेळी ५ व्या चेडूंवर ग्लेन मॅक्सवेलने मोठा फटका मारला. हा चेडूं सीमारेषेच्या बाहेर जात होता. (Latest sports updates)

मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी असलेल्या Ajinkya Rahane ने भन्नाट डाइव्ह मारत अप्रतिम सेव्ह केला. यासह त्याने आपल्या संघासाठी ५ धावा वाचवल्या. (Ajinkya Rahane Effort)

चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबे आणि डेवोन कॉनव्हेने अप्रतिम फलंदाजी केली.

शिवम दुबेने या डावात फलंदाजी करताना ५२ तर कॉनव्हेने ८३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर फाफ डू प्लेसिसने ६२ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७२ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com