MI VS CSK Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंनी जोरदार कमगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला आहे.
हा सामना जिंकून देण्यात अजिंक्य रहाणेने मोलाची भूमिका बजावली.
अजिंक्य रहाणे फक्त टेस्ट क्रिकेट खेळू शकतो. तो टी -२० क्रिकेटसाठी परफेक्ट चॉईस नाहीये, असं अनेकदा म्हटलं गेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो कसोटी संघातून देखील बाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला निवृत्त होण्याचा सल्ला देखील दिला होता.
मात्र आता आयपीएल स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळताच रहाणेची बॅट तळपली. तुफानी खेळी करत त्याने निवृत्ती घे असं म्हणणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
अजिंक्य रहाणेने यापूर्वी देखील राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना अप्रतिम फलंदाजी केली आहे. मात्र आता संघाबाहेर होण्याच्या वाटेवर असताना ही खेळी त्याच्या कारकिर्दीसाठी संजीवनी ठरू शकते. (Latest sports updates)
वानखेडेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईचे गोलंदाज ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी सारख्या फलंदाजांचा अभ्यास करून आले होते. मात्र अजिंक्य रहाणे हा पाठ्यपुस्तकाबाहेरचा धडा ठरला.
धावांचा पाठलाग करत असताना अजिंक्य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या डावात त्याने अवघ्या १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
या विक्रमांना घातली गवसणी..
अजिंक्य रहाणेने या डावात ७ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने २७ चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी केली. यासह तो आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
तसेच चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुरेश रैनाने १६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.