Ajinkya Rahane Comeback: मुंबईकरच घेणार मुंबईकराची जागा! WTC च्या फायनलसाठी BCCI चा मास्टरप्लॅन तयार

Ajinkya Rahane Comeback In Team India: लवकरच WTC च्या फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya Rahanesaam tv

WTC FInal: आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर ७ ते ११ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर रंगणार आहे. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

भारतीय फॅन्सला एक प्रश्न सतावतोय, तो म्हणजे पाचव्या क्रमाकांवर कोणाला संधी मिळणार? मात्र हा प्रश्न लवकरच मिटणार आहे. कारण आयपीएल स्पर्धेत एक असा फलंदाज आहे जो पाचव्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

Ajinkya Rahane
Virat - Rohit Exit In IPL?: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! विराट अन् रोहीत IPL मधुन घेणार एक्सिट,मोठं कारण आलं समोर

श्रेयसची रिप्लेसमेन्ट मिळाली..

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाला नंबर ५ वर कोण खेळणार हा प्रश्न सतावतोय. या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येऊन भारतीय संघासाठी महत्वाची खेळी करत होता. मात्र काही महिन्यांपासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली होती.

मात्र तो या संधीचं सोनं करू शकला नव्हता. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो शून्यवार बाद होऊन माघारी परतला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादवला पुन्हा भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

हा फलंदाज घेणार श्रेयस अय्यरची जागा..

भारतीय संघात कमबॅक करू पाहणारा अजिंक्य रहाणे सध्या आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ७१ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीनंतर आता त्याला भारतीय संघात स्थान देण्यात मागणी जोर धरू लागली आहे. नंबर ५ साठी अजिंक्य रहाणे हा परफ़ेकत चॉईस असू शकतो. कारण गेल्या काही वर्षांपासून तो या क्रमाकावर फलंदाजी करतोय. फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. मात्र आता आयपीएल स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये २०९धाव करत त्याने भारतीय संघात कमबॅक करण्यासाठीचे दार ठोठावले आहे. (Latest sports updates)

Ajinkya Rahane
MS Dhoni Bole Jo Koyal Bago Mein: धोनी स्टेडियममध्ये येताच 'बोले जो कोयल' गाणं का वाजलं? Viral Video मध्ये लपलंय खरं कारण

कोलकाताविरुद्ध चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने चांगली सुरुवात करून देत ५६ धावा केल्या. तर शिवम दुबेने ५० धावा केल्या.

या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने नाबाद ५३ धावा केल्या. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून ४९ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com