Virat - Rohit Exit In IPL?: क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! विराट अन् रोहीत IPL मधुन घेणार एक्सिट,मोठं कारण आलं समोर

Virat Kohli And Rohit Sharma: स्पर्धेतील दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतून बाहेर होऊ शकतात.
virat kohli and rohit sharma
virat kohli and rohit sharma saam tv
Published On

World Test Championship Final: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ३३ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान आता क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्वतली जात आहे. स्पर्धेतील दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतून बाहेर होऊ शकतात. काय आहे कारण जाणून घ्या.

आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना ७ जून ते ११ जून या कालावधीत पार पडणार आहे. या सामन्यासाठी लवकरच शिव सुंदर दास यांच्यात अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती १६ सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे.

virat kohli and rohit sharma
Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर काय करत आहे मास्टर ब्लास्टर 'सचिन तेंडुलकर', किती आहे एकूण संपत्ती? जाणून घ्या

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड २३ किंवा २४ मे रोजी काही भारतीय खेळाडूंसह इंग्लंडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इन्साईड स्पोर्ट्सला सांगितले की, 'मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राहुल द्रविड काही भारतीय खेळाडूंसह इंग्लंडला रवाना होणार आहे. जे संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर होतील त्या संघातील खेळाडू राहूल द्रविडसह इंग्लंडला जाणार आहेत.'

जर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला तर, विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील त्यांच्यासह इंग्लंडला रवाना होऊ शकतात. (Latest sports updates)

virat kohli and rohit sharma
Sachin Tendulkar House: 100 कोटींच्या अलिशान बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर',पाहा घराच्या आतील फोटो

श्रेयस अय्यर खेळणार का?

भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पाठीची यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र तो कमीत कमी ६ महिने तरी संघाबाहेर राहणार आहे. त्याच्या ऐवजी आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करत असलेल्या अजिंक्य रहाणेला संधी दिली जाऊ शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी असा असू शकतो १६ सदस्यीय भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत,मोहम्मद सिराज, उमरान मलिक, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकत, उमरन मलिक, जयदेव उनाडकत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com