IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

Team bus fire: आयपीएल 2026 फायनलनंतर गुजरात टायटन्सच्या टीम बसला अहमदाबादमध्ये अचानक आग लागल्याची घटना समोर आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात असून शुभमन गिलसह सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सुरक्षित आहेत.
gujarat titans bus fire
gujarat titans bus firesaam tv
Published On

आयपीएल 2026 च्या फायनल सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर टीम हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागल्याची माहिती समोर आलीये. सुदैवाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफ सुरक्षित आहेत.

गुजरात टायटन्सच्या बसला अचानक आग

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने गुजरात टायटन्सचा पराभव केला. दरम्यान सामना संपल्यानंतर गुजरात टायटन्सची टीम बसने हॉटेलकडे निघाली होती. याच दरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

gujarat titans bus fire
Shubman Gill: सूर्यानंतर गिलचंही वनडे कर्णधारपद जाणार? कोण घेणार प्रिन्सची जागा? या खेळाडूचं नाव चर्चेत

दरम्यान प्रकार लक्षात येताच चालकाने तत्काळ बस थांबवली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलसह सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांना तातडीने बसमधून खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती आहे.

मात्र, या आगीमुळे गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना काही काळ रस्त्यावरच थांबावं लागलं होतं. जवळपास एका तासानंतर टीमसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आलं.

गुजरात टायटन्ससाठी रविवारीची रात्र एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. एका बाजूला टीमला अंतिम सामन्यात आरसीबीकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि विजेतेपद हुकलं. त्यानंतर काही वेळातच टीम बसला आग लागल्याने खेळाडूंना आणखी एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं.

gujarat titans bus fire
RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

दरम्यान अंतिम सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सच्या कामगिरीबाबतही चर्चा सुरू झालीये. सलग सामने आणि मोठ्या प्रवासामुळे टीमवर थकव्याचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

gujarat titans bus fire
Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

दरम्यान अंतिम सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सच्या कामगिरीबाबतही चर्चा सुरू झालीये. सलग सामने आणि मोठ्या प्रवासामुळे टीमवर थकव्याचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com