RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

IPL 2026 Final: आयपीएल २०२६ चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
 IPL 2026 Final:
RCB players celebrate after defeating Gujarat Titans in the IPL 2026 final and securing their second consecutive championship title.saam tv
Published On
Summary
  • आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला.

  • रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने सलग दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकले.

  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगला

RCB vs GT, IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने क्रिकेट विश्वात पराक्रम केला आहे. पराक्रमाची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स (जीटी) संघाला पराभूत करत सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, बेंगळुरुने प्रत्येक विभागात प्रभावी कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केलं आणि ५ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह, आरसीबी आयपीएल विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरला. आयपीएल २०२६मध्ये आरसीबीनं धमाकेदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सनं दिलेलं १५६ धावांचे आव्हान आरसीबीने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत पार केलं.

अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी हवी त्याच पद्धतीने फटकेबाजी करत विराट कोहलीनं आपल्या संघाला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिलं. विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी स्फोटक सुरूवात केली. विराट कोहलीने सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने ३० चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावा केल्या.

विराट कोहलीची सामना जिंकवून देणारी खेळी

१५६ धावांचे लक्ष्य गाठताना व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने आरसीबीला स्फोटक सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने चार चौकार आणि दोन षटकारांसह १६ चेंडूंमध्ये ३२ धावा ठोकल्या. मात्र देवदत्त पडिक्कल केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर रशीद खानने एकाच षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांना बाद करून गुजरातच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने एक बाजू सांभाळून धरली. यातनंतर टीम डेव्हिडने १७ चेंडूंमध्ये २४ धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान, विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून संघाचा विजय निश्चित केला.

गोलंदाजांनी विजयाचा पाया रचला

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आरसीबीने दमदार सुरुवात केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी कर्णधार रजत पाटीदारचा गोलंदाजी घेण्याचा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने कर्णधार शुबमन गिलला अवघ्या १० धावांवर बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. त्यानंतर लगेचच साई सुदर्शन १२ धावांवर बाद झाला. मग जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अष्टपैलू कृणाल पांड्याने अचूक वाईड यॉर्कर टाकून त्याला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com