Shubman Gill: सूर्यानंतर गिलचंही वनडे कर्णधारपद जाणार? कोण घेणार प्रिन्सची जागा? या खेळाडूचं नाव चर्चेत

Team India Captaincy: आयपीएल २०२६ नंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात. बीसीसीआय वनडे आणि टी-२० टीमसाठी एकाच कर्णधाराची नियुक्ती करण्याचा विचार करतेय.
Team India Captaincy
Team India Captaincysaam tv
Published On

आयपीएल २०२६ नंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टी-२० टीममध्ये बदल होणार असून आता वनडे टीमसाठीही महत्त्वपूर्ण योजना आखल्या आहेत. सूर्यकुमार यादवचं टी-२० कर्णधारपद धोक्यात आलं असून आता वनडे कर्णधार शुभमन गिललाही पदावरून हटवलं जाऊ शकतं.

बीसीसीआय दोन्ही फॉरमॅटसाठी एकाच कॅप्टनची नियुक्ती करण्याचा विचार करतेय. दरम्यान, ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी श्रेयस अय्यरचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

Team India Captaincy
BCCI Rules 2026: IPL मध्ये हनीट्रॅपचा धोका? बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट नियमावली जाहीर

बीसीसीआयच्या एका सूत्राने एनडीटीव्हीला सांगितलं की, टीम इंडियाच्या निवड समितीने व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी एकाच कॅप्टनची नियुक्ती करण्याबाबत चर्चा केली आहे. टीम इंडिया आता २०२७ वनडे वर्ल्डकप आणि २०२८ टी-२० वर्ल्डकपची तयारी सुरू करणार आहे.

बीसीसीआय सोर्सने काय सांगितलं?

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नवीन टी-२० टीममध्ये काही बदल होऊ शकतात. आम्ही टी-२० आणि वनडे या दोन्ही टीम्समध्ये एकाच खेळाडूला संधी देण्याचा विचार करतोय. आमचं लक्ष आता दोन्ही फॉरमॅटवर असणार आहे. बीसीसीआयला नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही खेळाडूंना संधी द्यायची आहे."

Team India Captaincy
Suryakumar yadav: सूर्या जाणार श्रेयस येणार? टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदासाठी ३ नावं चर्चेत

श्रेयस अय्यरच्या नावाची चर्चा

वनडे आणि टी-२० कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार होत असल्याची चर्चा आहे. अय्यरने आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केलीये. तो वनडे सामन्यांमध्ये भारताचा उपकर्णधार आहे आणि आता त्याच्या टी-२० टीममध्ये कमबॅकची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच दोन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदासाठी त्याच्या नावाचा विचार केला जात आहे.

Team India Captaincy
KKR चा सलग चौथा विजय; दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चारली धूळ

सूर्या-गिलचं कर्णधारपद जाणार

शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या कर्णधारपदावरील दबाव आता वाढू शकतो. सूर्याला २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत संघाचं नेतृत्व करायचंय. तर निवड समितीने २०२७ चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती केलीये. मात्र आता दोघांची जागा घेण्यासाठी श्रेयस अय्यरला प्रमुख दावेदार मानलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com