Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

Sachin Tendulkar Praised Krunal Pandya: आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने जोस बटलरची विकेट घेतली.
Sachin Tendulkar Praised Krunal Pandya:
Krunal Pandya celebrates after dismissing Jos Buttler with a brilliant delivery during the IPL 2026 final.saam tv
Published On
Summary
  • कृणाल पांड्याने आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली.

  • त्याने गुजरात टायटन्सचा प्रमुख फलंदाज जोस बटलरला बाद केले.

  • कृणालच्या जादुई चेंडूमुळे बटलर पूर्णपणे चक्रावून गेला.

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) च्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची नांगी ठेचत पुर्णपणे उद्ध्वस्त केली. पॉवरप्लेमध्ये शुबमन गिल आणि साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातच्या आशा त्यांचा सर्वात अनुभवी फलंदाज जोस बटलरवर अवलंबून होत्या. बटलर मोठी खेळी करून संघाला चांगली धावसंख्या मिळवून देईल अशी आशा होती.

मोठ्या सामन्यांमध्ये बटलर नेहमीच धोकादायक ठरत असतो, पण या शानदार सामन्यात आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने असा जादूवाला चेंडू टाकला की, त्याने केवळ बटलरलाच चक्रावून सोडले नाहीतर तर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही त्याचे कौतुक करण्यास भाग पाडलं.

बटलर चक्रावला

फायनलच्या सामन्यात कृणाल पांड्याने भेदक गोलंदाजी करत आपल्या चार षटकांत केवळ २३ धावा दिल्या. यासह गुजरातचा सर्वात घातक फलंदाज जोस बटलरचीही विकेट घेतली. गुजरातच्या डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कृणाल पांड्याविरुद्ध जोस बटलर क्रीजवर आधीच स्थिरावला होता. षटकाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर बटलरने पुढे येत एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी कृणालने चतुराईने चेंडू टाकला. कृणालने पांड्यानं बटलरनं पुढे येताना पाहिल्यानंतर त्याने चतुराईने चेंडू जोरात टाकला. वाईड यॉर्करच्या लांबीवर टाकल्यानं बटलरला फटका मारता आला नाही, पण चेंडू त्याच्या बॅटला चुकवून थेट यष्टीरक्षकाकडे गेला. जितेश शर्माने यष्टीमागे कोणतीही चूक न करता बटलरला यष्टीचीत केले.

सचिन तेंडुलकरनं केलं कौतुक

कृणाल पांड्याची गोलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरही भारावला. त्यांनी सशल मीडियावर कृणालच्या लाइन-लेंथचं कौतुक केलं. त्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृणालच्या गोलंदाजीचे कौतुक करताना लिहिले की, "कृणाल पांड्याचा काय अप्रतिम चेंडू होता! चेंडू टाकण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने फलंदाजाच्या पायांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. मग त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवण्यासाठी एक अचूक चेंडू टाकला."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com