क्रिकेटर अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

IPL Cricketer Abhishek Porel Arrested : क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलला हुगळी पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आश्वासन आणि लैंगिक संबंधांच्या आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे.
Abhishek Porel medical student complaint marriage promise case
Abhishek Porel medical student complaint marriage promise casesaam tv
Published On

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलला अटक करण्यात आली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून हुगळी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पोरेलला ताब्यात घेतले आहे. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे मोगरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Abhishek Porel medical student complaint marriage promise case
ODI World Cup : २ वेळा वर्ल्ड चॅम्पियन, पण सलग तिसऱ्यांदा थेट पात्र नाही; अपयशी ठरतोय एकेकाळचा दिग्गज संघ

अटक केल्यानंतर पोरेलची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. त्यानंतर त्याला चिन्सुराह न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी मंगळवारीच जामिनासंदर्भातील सुनावणीही होणार होती. पण त्याआधीच कोलकत्ता उच्च न्यायालयाने पोलिसांना पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, हुगळीतील मोगरा पोलीस ठाण्यात एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने पोरेलविरोधात तक्रार दाखल केली. पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. दोघांमधील काही खासगी क्षणाचे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केलाय.

Abhishek Porel medical student complaint marriage promise case
Yash Dhull: भर मैदानात IPL स्टार खेळाडूंनी पडकली एकमेकांची कॉलर; Video व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?

तक्रारदार विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबाबत चर्चाही झाली होती. मात्र, त्यानंतर पोरेलचे इतर महिलांशी संबंध होते, अशी माहिती तिला मिळाल्याचा दावा तिने केलाय. त्याचे इतर महिलेशी संबंध असल्यानं तिने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणातील आरोप सध्या तक्रार आणि FIRमध्ये नमूद केलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. या आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत तपासली जाणार आहे.

या प्रकरणाच्या FIRमध्ये एकूण 19 कलमांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. FIRनुसार, कथित घटना 2 एप्रिल 2026 रोजी दिल्लीत घडल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. तक्रारीत पोरेलने तिला कथितरित्या एका ठिकाणी जाण्यापासून रोखले आणि तिला पुरेसे जेवणही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिला जाणीवपूर्वक इतरांपासून दूर ठेवण्यात आल्याने तिची शारीरिक स्थिती बिघडली आणि चालण्यासही अडचण निर्माण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com