

अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला असला तरी, अफगाणिस्ताननं आयर्लंडला ९२ धावांनी पराभूत केलं. या विजयासह अफगाणिस्तान संघ २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरलं. त्यांना आता पात्रता फेरीत खेळावे लागणार नाही. दुसरीकडं, एकेकाळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजला स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी पुन्हा एकदा क्वालिफायर फेरीतून जावे लागेल.
१९७५ आणि १९७९ मध्ये वनडे विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ सतत तिसऱ्यांदा थेट क्वालिफाय करण्यात अपयशी ठरला आहे. वेस्ट इंडिजने २०१९ मध्ये थेट क्वालिफाय केले नव्हते, कारण ते वनडे रँकिंगमध्ये टॉप-८ मध्ये राहू शकले नव्हते. तरी सुद्धा, झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेद्वारे त्यांनी स्थान पक्के केले होते. २०२३ विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ ना थेट क्वालिफाय करू शकला ना क्वालिफायरच्या माध्यमातून त्यांना स्थान मिळाले. आता २०२७ च्या विश्वचषकातही वेस्ट इंडिजची नौका डगमगली आहे आणि त्यांना क्वालिफायर स्पर्धा खेळूनच जागा मिळू शकेल.
वेस्ट इंडिज सध्याच्या वनडे रँकिंगमध्ये १०व्या स्थानावर आहे. आयसीसी वनडे विश्वचषकासाठी आयसीसीच्या सध्याच्या नियमानुसार, यजमान संघ सोडून, वनडे रँकिंगमध्ये अव्वल आठमध्ये समाविष्ट असलेले संघ विश्वचषकासाठी थेट क्वालिफाय होतात. २०२७ चा वनडे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका अव्वल आठमधील एकमेव यजमान संघ आहे, तर झिम्बाब्वे ११व्या स्थानावर आहे. याचा अर्थ असा आहे की नवव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशलाही थेट क्वालिफाय करण्याची संधी मिळू शकते, तर १०व्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजला थेट क्वालिफिकेशनच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलंय.
वेस्ट इंडिजला विश्वचषक २०२७ मध्ये थेट क्वालिफाय करण्यासाठी आवश्यक होते की आयर्लंडच्या संघाने अफगाणिस्तानचा ५-० किंवा ४-१ ने पराभव करावा, तसेच वेस्ट इंडिजने भारताविरुद्धची दोन सामन्यांची वनडे मालिका २-० ने जिंकावी. मात्र, असे होताना दिसत नाही.
आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान पहिला वनडे पावसामुळे रद्द झाला आणि दुसरा अफगाणिस्तानने जिंकला आहे. आयर्लंडचा संघ मालिका तेव्हाच ३-१ ने जिंकू शकतो जेव्हा तो उर्वरित सर्व सामने जिंकेल. याचा अर्थ असा आहे की भारताविरुद्ध २-० असा विजय वेस्ट इंडिजसाठी आयसीसी रँकिंगच्या अव्वल नऊमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध अखेरची द्विपक्षीय वनडे मालिका २००६ मध्ये जिंकली होती. भारतातील त्यांची शेवटची द्विपक्षीय वनडे मालिका २००२ मध्ये झाली होती. त्यात त्यांनी विजय मिळवला होता. ही आकडेवारी पाहता वेस्ट इंडिज भारताला २-० ने पराभूत करू शकेल असेही वाटत नाही.
वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. १९८३ मध्येही ते विजयाचे प्रबळ दावेदार होते, परंतु फायनलमध्ये त्यांना कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पराभूत केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलियासोबत वेस्ट इंडिज त्या तीन संघांपैकी एक आहे ज्यांनी ही स्पर्धा एकापेक्षा जास्त वेळा जिंकली आहे. भारतानेही ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने सहा वेळा जेतेपद पटकावले आहे. वेस्ट इंडिजची गेल्या दोन दशकांत झालेली स्थिती पाहता त्यांच्या प्रतिभेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.