CSK ला पराभूत करत SRH नं मिळवलं प्लेऑफचं तिकीट; गुजरात टायटन्सचीही चांदी

SRH IPL 2026 Playoff: सनरायझर्स हैदराबाद आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. एसआरएचने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. गुजरात टायटन्सनेही प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
SRH IPL 2026 Playoff:
Sunrisers Hyderabad defeated Chennai Super Kings by five wicketssaam tv
Published On

सनरायझर्स हैदराबादने (SRH) आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सला (CSK) पाच गडी राखून पराभूत केले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने CSK ला हरवून आपले प्लेऑफमध्ये एंट्री घेतली. इतकेच नाही हैदराबादच्या विजयामुळे गुजरात टायटन्सलाही प्लेऑफचं तिकीट मिळवलं.

SRH IPL 2026 Playoff:
IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

१३ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून एसआरएच (SRH) आणि जीटी (GT) यांचे प्रत्येकी १६ गुण आहेत. चांगल्या नेट रन रेटमुळे जीटी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर एसआरएच तिसऱ्या स्थानावर कायम आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) १३ सामन्यांतून १८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरला आहे. १३ सामन्यांतील सातव्या पराभवानंतर सीएसके एक स्थान खाली घसरला आहे. हैदराबाद आणि गुजरातच्या प्लेऑफमधील एंट्रीमुळे आयपीएलमध्ये 'एक अनार सौ बिमार' सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

SRH IPL 2026 Playoff:
DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

जागा एक अन् संघ पाच

प्लेऑफसाठी फक्त चार संघ पात्र ठरतात. परंतु चालू हंगामात प्लेऑफची फक्त एक जागा रिक्त आहे. सीएसकेसह पाच संघ या जागेसाठीच्या शर्यतीत आहेत. सीएसकेला आपला शेवटचा लीग सामना जिंकूनच १४ गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे. सीएसकेच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स पॉईट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आला आहे. राजस्थान वगळता इतर कोणत्याही संघाला १६ पाईंट्स घेता येणार नाही.

त्यामुळे उर्वरित संघांच्या आशा केवळ त्यांच्या स्वतःच्या विजयांवरच नव्हे, तर इतर संघांच्या पराभवांवरही अवलंबून असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स (एमआय) आणि लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडलेत. दोघांनीही १२ सामन्यांमधून प्रत्येकी ८ गुण मिळवले आहेत. यष्टीरक्षक इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. इशानने आपल्या ४७ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि तीन षटकारांसह ७० धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com