Lungi Ngidi : झेल घेताना लुंगी एनगिडी डोक्यावर आपटला; अ‍ॅबुलन्सनं रुग्णालयात नेलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून अनेकांचा श्वास थांबला

Delhi Capitals vs Punjab Kings : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स आणि अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स हे संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
Lungi Ngidi being taken off the field after a serious head injury during IPL 2026 match.
Lungi Ngidi being taken off the field after a serious head injury during IPL 2026 match.
Published On

आयपीएल २०२६ च्या डबल हेडर सामन्यातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. मात्र सामन्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज लुंगी एनगिडीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंजाब किंग्सच्या फलंदाज प्रियांश आर्याचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात असताना लुंगी एनगिडीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एनगिडीला गंभीर दुखापत झाली असून त्याला मैदानातून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्लीने २० षटकांत २ गडी गमावत पंजाबसमोर २६४ धावा केल्या. केएल राहुलने ६७ चेंडूंमध्ये १५२ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबनेही दमदार सुरुवात केली.

Lungi Ngidi being taken off the field after a serious head injury during IPL 2026 match.
विराट कोहलीचं वादळ! ३६ चौकार, १२ षटकार अन् ३ अर्धशतक; IPL २०२६ मध्ये एकच 'किंग'

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दोन षटकांच्या अखेरीस पंजाब किंग्सने एकही गडी न गमावता ३६ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ षटकांत एकही गडी न गमावता पंजाब किंग्सने ८३ धावा केल्या आहेत. पंजाबच्या खेळाडूंच्या वाढती भागीदारी पाहता दिल्लीचे खेळाडू विकेटच्या शोधात होते. प्रतिस्पर्धी संघाची विकेट घेण्याच्या शोधत दिल्लीचा संघ होता. त्याचवेळी अनर्थ घडला.

Lungi Ngidi being taken off the field after a serious head injury during IPL 2026 match.
IPL मध्ये नेट बॉलरला मोठी दुखापत; वेगाने येणारा चेंडू लागल्याने रक्तबंबाळ, रुग्णालयात तातडीने उपचार सुरू

२६५ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब किंग्सने पहिल्या दोन षटकांत ३६ धावा केल्या. त्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टाकलेल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जो मिड-ऑफच्या दिशेने उंच गेला. त्यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या लुंगी एनगिडीने झेल पकडण्याच्या प्रयत्नात मागे धावू लागला. पण त्याचा तोल गेला. तोल सांभाळू न शकल्याने तो त्याच्या डोक्यावर पडला. त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com