विराट कोहलीचं वादळ! ३६ चौकार, १२ षटकार अन् ३ अर्धशतक; IPL २०२६ मध्ये एकच 'किंग'

Virat Kohli Storms IPL 2026 : भारताचा शक्तिशाली फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या फलंदाजीनं धुमाकूळ घातला आहे. कोहलीने षटकारांचे त्रिशतक पूर्ण केलं आहे. तर सर्वाधिक धावाही विराटच्याच नावावर आहेत.
Virat Kohli Storms IPL 2026
Virat Kohli in top form during IPL 2026, leading the run charts.
Published On
Summary
  • कोहलीच्या तुफान फलंदाजीमुळे IPL मध्ये विक्रम बनले आहेत.

  • IPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे.

  • विराट कोहली IPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

भारताचा शानदार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२६च्या हंगामात तुफान फलंदाजी करत आहे. या हंगामात आतापर्यंत विराट कोहलीने सात सामन्यांमध्ये ५४.६७ च्या सरासरीने आणि १६३.१८ च्या स्ट्राइक रेटने ३२८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या काळात तीन अर्धशतके झळकावली आहेत.

Virat Kohli Storms IPL 2026
IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

आयपीएल २०२६ मधील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ८१ धावा आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२६ च्या हंगामात ३६ चौकार आणि १२ षटकार मारलेत. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूंमध्ये ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने १८४.०९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने धावा केल्या आहेत.

आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीचा कहर

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने १८.५ षटकांत ५ गडी गमावून २०६ धावा केल्या आणि ७ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. विराट कोहलीसोबत देवदत्त पडिक्कलने २७ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ६ षटकारांसह ५५ धावा केल्या.

Virat Kohli Storms IPL 2026
RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

कोहलीने अभिषेक शर्माला पिछाडलं

विराट कोहलीने आता ऑरेंज कॅप पुन्हा मिळवली आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये भारतीय फलंदाज अभिषेक शर्मालाही मागे टाकले आहे. विराटने सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. कोहलीने आयपीएल २०२६ हंगामात आतापर्यंत सात सामन्यांमध्ये ५४.६७ च्या सरासरीने आणि १६३.१८ च्या स्ट्राइक रेटने ३२८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आयपीएल २०२६ च्या हंगामात २५ चौकार आणि २७ षटकार मारले आहेत.

तर अभिषेक शर्मा आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याने ७ सामन्यांमध्ये ५३.८३ च्या सरासरीने आणि २१५.३३ च्या स्ट्राइक रेटने ३२३ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने या काळात एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएल २०२६ मधील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १३५ आहे.

आयपीएलमध्ये विराट कोहलीचे ३०० षटकार पूर्ण

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एक इतिहास बनवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक ८०० चौकारांसह ३०० षटकारांचा टप्पा गाठला. गुजरातविरुद्धच्या कालच्या सामन्यात सर्वाधिक चौकार करणारा खेळाडूही विराट ठरला. कोहलीने रशीद खानच्या एका शॉर्ट बॉलवर मिड-विकेटवरून षटकार मारत आपलं शतकांचं त्रिशतक पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com