IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

RCB vs Gujarat Titans IPL 2026 match highlights : आयपीएल 2026 मध्ये विराट कोहलीच्या शानदार 81 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून विजय मिळवला. साई सुदर्शनच्या शतकानंतरही गुजरातला पराभव पत्करावा लागला.
Virat Kohli
Virat Kohli RCB
Published On

Virat Kohli 81 runs chase innings details : बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा (GT) ५ गडी राखून पराभव केला. गुजरातचा पराभव करत आरसीबीने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हाय-स्कोअरिंग सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीमुळे RCB ने 206 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. विराटच्या अर्धशतकामुळे साई सुदर्शन याचं शतक वाया गेले. गुजरातच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या (100 धावा) शानदार शतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आरसीबीने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहलीने 81 धावांची जबरदस्त खेळी केली, तर देवदत्त पडिक्कलने 55 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत काही विकेट्स गेल्याने सामना रंजक झाला होता, पण अखेर आरसीबीने 18.5 षटकात विजय साकारला.

Virat Kohli
RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

साई सुदर्शनचे ऐतिहासिक शतक

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर साई सुदर्शनने मैदानाच्या चहुबाजूला फटकेबाजी करत केवळ 57 चेंडूत आपले शानदार शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्याला कर्णधार शुभमन गिलने (32 धावा) चांगली साथ दिली. गुजरातने निर्धारित 20 षटकात 3 बाद 205 धावा उभारल्या.

Virat Kohli
Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

कोहली-पडिक्कलची वादळी फलंदाजी

206 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. 'चेस मास्टर' विराट कोहली आज वेगळ्याच रंगात दिसला. त्याने अवघ्या 44 चेंडूत 81 धावा कुटल्या. त्यात 8 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला देवदत्त पडिक्कलनेही आपल्या बॅटची जादू दाखवत केवळ 27 चेंडूत 55 धावांची वेगवान खेळी केली. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत विजयाचा पाया रचला.

अखेरच्या षटकांत रंजक वळण

कोहली आणि पडिक्कल बाद झाल्यानंतर सामन्यात थोडे रंजक वळण आले होते. रशिद खान आणि जेसन होल्डर यांनी विकेट घेत आरसीबीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कृणाल पांड्याने अखेरीस 7 चेंडूत नाबाद 16 धावा करत 19 वे षटक संपण्यापूर्वीच आरसीबीला विजय मिळवून दिला.

Virat Kohli
Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com