Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

Petrol Diesel rate today Mumbai : निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई आणि पुण्यात पेट्रोल 130 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता असून, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.
Petrol-Disel Price Hike
Petrol-Disel Price HikeSaam Tv
Published On

पश्चिम बंगाल.... तामिळनाडू....केरळ.... आसाम आणि पदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे... पेट्रोलच्या दरात तब्बल 28 रुपयांची वाढ होण्याची शक्यताच कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालातून समोर आलीय..या अहवालात नेमकं काय म्हटलंय....पाहूयात...

5 राज्यांच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून इंधनाच्या किंमती गोठवण्यात आल्या आहेत. मात्र 29 एप्रिलला निवडणूक संपताच तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय दरानुसार किंमती वाढवण्याची शक्यता आहे. कारण इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरच्या वर गेलेत. त्यामुळे 27 मार्चला पेट्रोल आणि डिझेलवरचा कर दहा रुपयांनी कमी केला होता... या निर्णयामुळे भारतीय तेल कंपन्यांना दर महिन्याला 27 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय... हा तोटा भरुन काढण्यासाठी डिझेल 25 तर पेट्रोल 28 रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे शहरात पेट्रोलचा दर 120 ते 130 रुपयांच्या पार जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.

Petrol-Disel Price Hike
RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

मात्र मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किती वाढ होऊ शकते...पाहूयात...

मुंबईत सध्या पेट्रोल 103 रुपये 50 पैसे आहे. त्यात 25 रुपयांची वाढ झाल्यास किंमत 128 रुपये 50 पैसे तर 28 रुपयांची वाढ झाल्यास 131 रुपये 50 पैसे होऊ शकते... तर सध्या 90 रुपये 3 पैसे असलेल्या डिझेलच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ जाल्यास डिझेल 115 तर 28 रुपयांची वाढ झाल्यास 118 रुपये इतकं महाग होऊ शकतं..

Petrol-Disel Price Hike
ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या रिपोर्टनंतर सरकारची चांगलीच धावाधाव झालीय..कारण तामिळनाडू, पदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये मतदान झालं असलं तरी पश्चिम बंगालमध्ये आणखी एका टप्प्याचं मतदान बाकी आहे... त्यामुळेच सरकारवर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढावलीय.

Petrol-Disel Price Hike
Mumbai Accident : पवईत भीषण अपघात, BMC तील तरूण डॉक्टरचा मृत्यू

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारपुढे नाही... त्यामुळे प्रसिद्ध झालेले रिपोर्ट दिशाभूल करणारे आहेत... गेल्या 4 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सरकारने कुठलीही वाढ केली नाही. 'कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज च्या रिपोर्टनंतर सरकारनं भाववाढीची कुठलीही योजना नसल्याचं स्पष्ट केलंय.. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सरकार दिलेला शब्द पाळणार की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार? याकडे देशवासीयांचं लक्ष लागलंय..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज...

Petrol-Disel Price Hike
महिला भक्तावर बलात्कार, पश्चिम महाराष्ट्रातून भोंदू भोसले महाराजाला बेड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com