

भारत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी
fake godman arrested in Maharashtra fraud case details : पश्चिम महाराष्ट्रात स्वतःला संत बाळूमामाचा आणि आता दत्तभक्त म्हणून मिरवणाऱ्या करमाळ्यातील मनोहर भोसले या भोंदू महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत. भोंदू भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे.
एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भक्तांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यात आणि कर्नाटकातील गाणगापूर येथे मठ व मंदिर आहे.
या ठिकाणी तो मोठी रक्कम घेऊन भविष्य पाहतो आणि मार्गदर्शन करतो. तसेच अडचणीत असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचे उपाय सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतो. त्याच्याकडे अनेक बड्या व्यक्तींचा राबता असतो, काही प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या तो संपर्कात असल्याचे फोटोदेखील व्हायरल झाले होते.
यापूर्वी २०२१ मध्येदेखील बारामतीतील एका युवकाच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, 'थायरॉईड कॅन्सर' बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला व भंडाऱ्याच्या नावाखाली त्याने अडीच लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.
तसेच एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फसवणूक व गुन्हेगारी प्रकरणांमुळेच पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.