

Pune And Mumbai to Gorakhpur summer special train schedule : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मूळ गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे येथून गोरखपूरसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. १५ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत एकूण २४८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पुणे येथून सुटणाऱ्या दैनंदिन गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांचे आरक्षण २६ एप्रिलपासून सुरू होत असून, 'विशेष शुल्कावर' या सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - गोरखपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक उन्हाळी विशेष गाड्या (१२४ सेवा)
गाडी क्र. 01079 विशेष गाडी दिनांक १५.०५.२०२६ ते दिनांक १५.०७.२०२६ पर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. (६२ सेवा)
गाडी क्र. 01080 विशेष दिनांक १७.०५.२०२६ ते दिनांक १७.०७.२०२६ पर्यंत गोरखपूर येथून दररोज १४:३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००:४० वाजता पोहोचेल. (६२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
पुणे - गोरखपूर - हडपसर दैनिक उन्हाळी विशेष गाड्या (१२४ सेवा)
गाडी क्र. 01415 विशेष गाडी दिनांक १५.०५.२०२६ ते दिनांक १५.०७.२०२६ पर्यंत दररोज सकाळी ०६.५० वाजता पुणे येथून सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. (६२ सेवा)
गाडी क्र. 01426 विशेष गाडी दिनांक १६.०५.२०२६ ते दिनांक १६.०७.२०२६ पर्यंत गोरखपूर येथून दररोज १७.३० वाजता सुटेल आणि हडपसर येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. (६२ सेवा)
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरंगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.