Mumbai Marathi Row: मुंबईत मराठीवरून राडा! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची हवा काढली, नेमकं झालं काय?

Mumbai Dahisar Marathi language protest Sanjay Nirupam attack : दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक करत तीची तोडफोड केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamSaam
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Marathi language row : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटले असून शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आज दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे रिक्षाचालकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या शिवसेनेचे नेते व माजी खासदार संजय निरुपम यांना मनसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मनसैनिकांनी निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. इतकेच नव्हे, तर मनसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या चाकातील हवा देखील काढली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून मनसैनिकांवर लाठीमार (लाठीचार्ज) करण्यात आला.

मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद तीव्र

दहिसरमधील गणपत पाटील नगर परिसरात आज शिवसेना नेते संजय निरुपम यांच्या भेटीदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. परप्रांतीय रिक्षाचालकांची भेट घेण्यासाठी आलेल्या निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला. यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Sanjay Nirupam
महिलेने महिलेचा केला निर्घृण खून, मेल्यानंतरही चाकूने वार; अत्यंत भयानक व्हिडिओ समोर

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी १ मेपासून मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून हा वाद उफाळून आला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या या निर्देशाला संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला असून, हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. "परप्रांतीय चालकांवर अन्याय होईल," असा मुद्दा निरुपम यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Nirupam
Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा फक्त ९ तासात पोहोचणार; १३ जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग; सिंधुदुर्गातील या गावांचा समावेश

दरम्यान, या भूमिकेमुळे शिवसेनेतच मतभेद उघड झाल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला मराठी सक्तीचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात असताना, दुसऱ्या बाजूला पक्षातीलच नेत्याकडून त्याला विरोध होत असल्याने पक्षात दुमत निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. घटनेदरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू दिला नाही. मात्र, या प्रकरणामुळे मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Sanjay Nirupam
India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com