नितीश राणाची अंपायरसोबत तू-तू, मैं-मैं; संतापलेल्या स्टब्सनं तावातावात फेकलं हेल्मेट, सामन्यादरम्यान चेपॉकमध्ये काय घडलं?

Tristan Stubbs Throws Helmet In Pavilion: चेपॉकमध्ये झालेल्या सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान मोठा राडा झाला. नितीश राणाने अंपायरशी वाद घातल्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने रागाच्या भरात आपले हेल्मेट फेकल्याची दिसत आहे.
Tristan Stubbs Throws Helmet In Pavilion:
Heated exchange between players and umpire during IPL 2026 match at Chepauk goes viral.
Published On
Summary
  • चेपॉकमध्ये आयपीएल सामन्यात मोठा वाद

  • नितीश राणा आणि अंपायरमध्ये तू-तू मैं-मैं

  • ट्रिस्टन स्टब्सने संतापात हेल्मेट फेकलं

चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने अखेर आयपीएल २०२६ मधील आपला पहिला विजय नोंदवला. सामन्यानंतर एक जबरदस्त राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला ग्लोव्हज बदलण्याची परवानगी नाकारण्यात आली तेव्हा मैदानावर जोरदार राडा झाला.

Tristan Stubbs Throws Helmet In Pavilion:
IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी पराभूत करत या हंगामातील पहिला मिळवला आहे. या विजयाचा हिरो संजू सॅमसन ठरला होता, त्याने ५६ चेंडूंमध्ये नाबाद ११५ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीत ४ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे गोलंदाज जेमी ओव्हरटनने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने चार बळी घेतले. सॅमसनच्या दमदार खेळीमुळे एमएस धोनीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला.

Tristan Stubbs Throws Helmet In Pavilion:
IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

सामन्यात नेमका राडा काय झाला?

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने फलंदाजी करताना ग्लोव्हज बदलण्याची मागणी केली. चेन्नईच्या उष्णता आणि दमटपणामुळे स्टब्स घामाने चिंब भिजला होता. त्यामुळे ग्लोव्हजमुळे हातात घाम सुटला होता, त्यामुळे ग्लोव्हज बदलव्यात असं त्याला वाटलं त्याने रितसर अंपायरकडे ग्लोव्हज बदलून देण्याची विनंती केली. मात्र, मैदानावरच्या पंचांनी खेळात विलंब होत असल्याचे कारण देत त्याची विनंती फेटाळून लावली.

विनंती फेटाळून लावल्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर स्टब्स बाद झाला. त्यामुळे खूप निराश झाल.स्टब्सच्या बाद होण्याने दिल्ली संघातील खेळाडू संतापले. इतकेच नाहीतर नितीश राणा थेट सीमारेषेवरील पंचांशी वाद घालू लागला. त्यानंतर संतापलेल्या स्टब्सने पॅव्हेलियनमध्ये परतताना चौथ्या अंपायरशी वाद घातला. त्यानंतर तावातावात आपले हेल्मेट फेकून दिलं.

दरम्यान नितीश राणाने आपली चूक मान्य केली आहे. अंपायरनं लावलेली शिक्षा स्वीकारली आहे. या संपूर्ण घटनेतून हे स्पष्ट झाले आहे की, आयपीएल कडक शिस्त पाळत असून खेळाडूंच्या मैदानातील वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नितीश राणाव्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही दंड ठोठावण्यात आला. संथगतीन गोलंदाजी केल्याप्रकरणी त्याला अंपायरनं दंड सुनावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com