IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

IPL 2026, KKR vs LSG: आयपीएल २०२६ चा १५ वा सामना रोमांचकरीत्या झाला. लखनौ सुपर जायंट्सने १८२ धावांचे लक्ष्य पूर्ण करून या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.
IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?
Published On

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२६ चा १५ वा सामना रोमांचकारी झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने अखेरच्या षटकात लखनौनं कोलकाताला पराभूत केलं. या लखनौच्या विजयाचा शिल्पकार मुकुल चौधरी ठरला.

मुकुल चौधरी विजयाचा नायक ठरला

१८२ धावांचे लक्ष्य गाठताना लखनौची सुरुवात डळमळीत झाली. एडन मार्कराम आणि मिचेल मार्श लवकर बाद झाले. ऋषभ पंत आणि निकोलस पूरन हे सुद्धा फार काळ टिकले नाहीत. १५.६ षटकांत लखनौची धावसंख्या १२८/७ होती आणि सामना केकेआरच्या बाजूने झुकलेला दिसत होता. पण तिथून पुढे मुकुल चौधरीने शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या २७ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ५४ धावा ठोकल्या. हेच नऊ फटके केकेआरच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. त्याच्या व्यतिरिक्त, आयुष बडोनीनेही ३४ चेंडूंमध्ये ५४ धावांची शानदार खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत १८१ धावा केल्या. फिन ॲलन केवळ ९ धावांवर बाद झाल्याने संघाची सुरुवात खराब झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणेने २४ चेंडूंमध्ये ४१ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर अंकुश रघुवंशीने ३३ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. दरम्यान, कॅमेरॉन ग्रीनने २४ चेंडूंमध्ये नाबाद राहत ३२ धावा आणि रोव्हमन पॉवेलने २४ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा करत धावसंख्या १८१ पर्यंत पोहोचवली. लखनौकडून गोलंदाजी करताना दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मणिकरण सिद्धार्थ आणि आवेश खान यांचा समावेश होता, त्यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मोहम्मद शमी सर्वात चांगली गोलंदाजी केली पण त्याला एकही बळी मिळाला नाही.

मुकुल चौधरी कोण आहे?

मुकुल चौधरी हा २१ वर्षीय राजस्थानचा खेळाडू आहे. यष्टीरक्षक-फलंदाज मुकुल चौधरी ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावात दाखल झाला होता. लखनौ संघाने त्याला २.६० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तो यष्टीरक्षक आणि फलंदाज असण्यासोबतच एक वेगवान गोलंदाजही आहे. तो त्याच्या मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तो गगनचुंबी षटकार मारतो. त्याच कौतुक खुद्द सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने केले आहे. मुकूलने आपल्या खेळीचा आणि फटकेबाजीचं उदाहरणही दाखवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com