IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

IPL CSK vs DC: आयपीएल २०२६ चा १८ वा सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला.
IPL CSK vs DC:
Sanju Samson and Jamie Overton celebrate after leading Chennai Super Kings to their first win of IPL 2026.saam tv
Published On

सलग दोन पराभवांनंतर सीएसकेला पहिला विजय मिळला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात संजू सॅमसन आणि जेमी ओव्हरटन विजयाचे हिरो ठरले. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एक रोमांचक सामना झाला. चिकाटीनं आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या संघाला अखेर पराभवाची चव चाखावी लागली. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना २३ धावांनी गमावला. गोलंदाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाला नामोहरम केलं.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबाज सुरुवात करून डावात वर्चस्व निर्माण केलं होतं. परंतु पहिली सलामीवीराच्या विकेट गेल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा घेत चेन्नई सुपर किंग्सने केवळ दोन गडी गमावत २१२ धावा केल्या. हा आव्हानचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत आपले सर्व गडी गमावत १८९ धावा केल्या. दिल्ल कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव झाला. यासह सीएसकेने पहिला विजय मिळवला.

IPL CSK vs DC:
Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

चेन्नई सुपर किंग्सने उभारला धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने चांगली सुरुवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने १५ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसननेही शानदार फलंदाजी करत ५६ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि चार उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या आयुष म्हात्रेनेही ३६ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या, त्यानंतर त्याला बाद घोषित करण्यात आले.

IPL CSK vs DC:
राजस्थान रॉयल्सच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर; कोणत्या संघाला झाला फायदा?

अखेरीस शिवम दुबेच्या १० चेंडूंतील २० धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत फक्त दोन गडी गमावून २१२ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेललाच एक विकेट मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com